औरंगाबाद : जिल्हा बँक निवडणुकीचा धक्कादायक निकाल समोर आला आहे. माजी विधानसभा अध्यक्ष आणि बँकेचे संचालक असलेले हरिभाऊ बागडे यांना पराभवाचा धक्का बदलाय. या निवडणुकीत अनेक अनपेक्षित निकाल पाहायला मिळत आहेत. जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रातील मोठं नाव असलेल्या बागडेंचा पराभव हा जिल्ह्याच्या राजकारणाचं बदललेलं वार असल्याचं बोललं जात आहे. (Haribhau Bagade lost, independent candidate Abhishek Jaiswal won)
जिल्हा बँक निवडणुकीत बागडे यांच्या पॅनलचा मात्र दणदणीत विजय झाला आहे. मात्र स्वत: बागडे यांना पराभवाचा सामना करावा लागलाय. अपक्ष उमेदवार अभिषेक जैस्वाल यांनी बागडे यांचा पराभव केलाय. बागडे यांना एकूण 123 मतं मिळाली, तर जैस्वाल यांना 147 मतं पडली. त्यामुळे जैस्वाल यांनी 24 मतांनी बागडे यांचा पराभव केला आहे. बिगर शेती संस्थेच्या विभागातून बागडे यांचा पराभव झाला आहे.
हरिभाऊ बागडे यांच्यासह अभिजित देशमुख यांनाही पराभवाचा सामना करावा लागला आहे. तर अपक्ष उमेदवार अभिषेक जैस्वाल आणि जगन्नाथ काळे विजयी झाले आहेत. मतमोजणीदरम्यान बागडे हे मतमोजणी केंद्रावर आले होते. पण पराभवाची चाहूल लागताच ते माघारी परतले.
दरम्यान, जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत शेतकरी विकास पॅनलच्या सर्वाधिक जागा निवडून आल्या आहेत. मात्र, बँकेचे जुने जाणते संचालक हरिभाऊ बागडे यांचा पराभव झाला आहे. बागडे यांच्या पराभवावर राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘गड आला पण सिंह गेला’ असं अब्दुल सत्तार यांनी म्हटलंय.
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीसाठी 21 मार्च रोजी मतदान पार पडलं. त्यावेळी मतदान केंद्राबाहेर एक पोलीस कर्मचारी आणि राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्यात शाब्दिक चकमक पाहायला मिळाली. पोलीस कर्मचाऱ्याने अब्दुल सत्तार यांना बाजूला थांबायला सांगितलं. त्यावरुन सत्तार यांनी मतदान केंद्राबाहेर चांगलाच गोंधळ घातल्याचं सांगितलं जात आहे. क्रांती चौकातील मतदान केंद्रावर तब्बल अर्धा तास हा गोंधळ सुरु होता. तर विरोधी पॅनलच्या लोकांकडून पैसे घेतल्याचा आरोप राज्यमंत्र्यांनी केला. त्यावर संतापलेल्या पोलिसांनी सत्तार यांना उत्तर दिलं. त्यानंतर बराच वेळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती.
इतर बातम्या :
Aurangabad Lockdown : औरंगाबाद जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय, शहरातील हॉटेल्स बुधवारपासून बंद!
Haribhau Bagade lost, independent candidate Abhishek Jaiswal won