पुणे: मावळ लोकसभा मतदारसंघात प्रतिष्ठेची लढत होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार आणि शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांच्यात ही लढत होत आहे. चौथ्या टप्प्यात म्हणजे 29 एप्रिलला या मतदारसंघात मतदान होत आहे. त्यामुळे दोन्ही पक्षाच्या स्टार प्रचारकांनी सध्या मावळमध्ये ठिय्या मांडला आहे. अवघ्या 60 तासात दोन्ही पक्षाचे तब्बल 29 स्टार प्रचारक मावळचं मैदान गाजवणार आहेत. महत्त्वाचं म्हणजे चार पुतणे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या साथीला असल्याचं चित्र आहे.
चार पुतणे पवारांसाठी मैदानात
मावळ लोकसभा मतदारसंघात पार्थ पवार यांच्या प्रचारासाठी चार दिग्गज नेत्यांचे पुतणे मैदानात आहेत. यामध्ये स्वत: शरद पवारांचे पुतणे अजित पवार, स्वर्गीय भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांचे पुतणे धनंजय मुंडे, बीडचे राष्ट्रवादीचे आमदार जयदत्त क्षीरसागर यांचे पुतणे संदीप आणि थेट पार्थ पवार यांचा प्रचार करत नसले, तरी शिवसेना-भाजपविरोधात प्रचार करत असलेले राज ठाकरे यांचा समावेश आहे. राज ठाकरे हे बाळासाहेब ठाकरे यांचे पुतणे आहेत. ते पनवेलमध्ये जाहीर सभा घेणार आहेत. पनवेलचा समावेश मावळ मतदारसंघात आहे.
मावळमध्ये मराठवाडा-विदर्भातील मतांचा टक्का
दरम्यान, मावळ लोकसभा मतदारसंघात मराठवाडा आणि विदर्भातील मतांचा मोठा टक्का आहे. त्यामुळे मराठवाडा आणि विदर्भातील अनेक नेते या मतदारांना आपल्या बाजूने खेचण्यासाठी मावळमध्ये दाखल झाले आहेत.
महत्वचे म्हणजे बीडचे राष्ट्रवादीपासून दूर असलेले नेते जयदत्त क्षीरसागर हे सेना-भाजपचा प्रचार करत आहेत, तर त्यांचे पुतणे संदीप क्षीरसागर हे मात्र राष्ट्रवादीचे स्टार प्रचारक आहेत.
पार्थ पवारांसाठी प्रचाराला येणारे नेते
संभाव्य नावे
शिवसेनेचे श्रीरंग बारणे यांच्या प्रचारासाठी येणारे नेते