Maharashtra Assembly election 2024 : ठाकरे गट मुंबईतल्या ‘या’ 25 मतदारसंघांवर सांगू शकतो दावा

| Updated on: Jul 18, 2024 | 12:28 PM

Maharashtra Assembly election 2024 : 288 सदस्यांच्या महाराष्ट्र विधानसभेत सरकार बनवण्यासाठी 145 आमदार निवडून येणं आवश्यक आहे. सध्या जनमताचा कौल बघता महाविकास आघाडीकडे सरशी साधण्याची चांगली संधी आहे. महाविकास आघाडीत मुंबईत ठाकरे गटाच वर्चस्व आहे.

Maharashtra Assembly election 2024 : ठाकरे गट मुंबईतल्या या 25 मतदारसंघांवर सांगू शकतो दावा
उद्धव ठाकरे
Follow us on

अजून दोन ते तीन महिन्यांनी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटाकडून यंदा बऱ्याच नव्या चेहऱ्यांना संधी मिळू शकते. सध्या ठाकरे गटाच्या अंतर्गत बैठका सुरु आहेत. पण महाविकास आघाडीच्या बैठका सुरु झाल्यानंतर खऱ्या अर्थाने जागा वाटपाची चर्चा सुरु होईल. लोकसभा निवडणुकीचा निकाल विधानसभा निहाय बघितला, तर महाराष्ट्रात महाविकास आघाडीच सरकार येऊ शकतं. 288 सदस्यांच्या महाराष्ट्र विधानसभेत सरकार बनवण्यासाठी 145 आमदार निवडून येणं आवश्यक आहे. सध्या जनमताचा कौल बघता महाविकास आघाडीकडे सरशी साधण्याची चांगली संधी आहे.

विधानसभा निवडणुकी ठाकरे गट वांद्रे पूर्व मधून वरूण सरदेसाई तर दहीसर मधून तेजस्वी घोसाळकर यांना पहिल्यांदाच विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याची शक्यता आहे. शिवाय अनेक नव्या चेहऱ्यांना विधानसभा निवडणुकीसाठी ठाकरेंच्या शिवसेनेकडून संधी मिळणार आहे.

2019 विधानसभेला काँग्रेसचे मुंबईतून किती आमदार निवडून आले?

2019 च्या निवडणुकीत काँग्रेसचे केवळ चार आमदार निवडून आले होते तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एका जागेवर विजय मिळवू शकला, 2024 च्या लोकसभा निवडणूक सुद्धा ठाकरेंनी आपल्या चार पैकी तीन जागा निवडून आणल्या. त्यामुळे एक प्रकारे शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या मुंबईकडे आगामी विधानसभा निवडणुकीत अधिकाधिक यश मिळवण्यासाठी उद्धव ठाकरे यांचे विशेष लक्ष असेल.

शिवसेना ठाकरे गट मुंबईतील कोणत्या जागांवर दावा करणार

संभाव्य जागा

१) शिवडी

२) भायखळा

३) वरळी

४) माहीम

५) चेंबूर

६) भांडूप पश्चिम

७) विक्रोळी

८) मागाठाणे

९) जोगेश्वरी पूर्व

१०)दिंडोशी

११)अंधेरी पूर्व

१२) कुर्ला

१३) कलिना

१४) दहिसर

१५) गोरेगाव

१६)वर्सोवा

१७) वांद्रे पूर्व

१८) विलेपार्ले

१९) कुलाबा

२०) वडाळा

२१) चांदीवली

२२) बोरिवली

२३) मलबार हील

२४) अनुशक्ती नगर

२५) मानखुर्द शिवाजीनगर