Deepak Kesarkar : ‘शरीराने शिवसेनेत अन् मनाने राष्ट्रवादीत’, केसरकरांचा राऊतांवर हल्लाबोल

| Updated on: Jul 09, 2022 | 5:37 PM

किरीट सोमय्या यांनी उद्धव ठाकरे यांचा उल्लेख माफिया असा केला होता. त्यावरुन शिंदे गट चांगलाच आक्रमक झाला आहे. शिवाय प्रवक्ते दीपक केसरकर यांनीही याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि किरीट सोमय्या यांच्याशी बोलणे झाले असल्याचे सांगितले आहे. शिवाय भविष्यात ते उद्धव ठाकरे यांच्याबाबत बोलणार नाहीत असे म्हणाले असल्याचे केसरकर यांनी सांगितले.

Deepak Kesarkar : शरीराने शिवसेनेत अन् मनाने राष्ट्रवादीत, केसरकरांचा राऊतांवर हल्लाबोल
दीपक केसरकर, संजय राऊत
Image Credit source: TV9
Follow us on

मुंबई : (Shivsena) शिवसेनेतील आमदारांनी कशामुळे बंडखोरी केली यामध्ये प्रामुख्याने नाव घेतले जात आहे ते (Sajnay Raut) संजय राऊत यांचे. बंडखोरीच्या पहिल्या दिवसांपासून संजय राऊत यांची वक्तव्य आणि त्यांनी केलेली टोकाची टिप्पणी यामुळेच ही परस्थिती ओढावल्याचे सांगितले जात होते. यातच शिंदे गटाचे प्रवक्ते (Deepak Kesarakar) दीपक केसरकर आणि संजय राऊत यांच्यात शाब्दिक चकमक सुरु आहे. दरम्यान, पक्षाशी एकनिष्ठ असल्याचे सांगणारे राऊत हे शरीराने शिवसेनेत तर मनाने राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये असल्याचा आरोप दीपक केसरकर यांनी केला आहे. त्यामुळे शिंदे गट आणि शिवसेनेतील अंतर हे आता अधिक वाढत आहे. आम्ही नरेंद्र मोदी, बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे यांचा चेहरा घेऊन जनतेसमोर गेलो होतो. यामध्ये कुणाचाही संबंध नसल्याचे म्हणत संजय राऊत यांना फटकारले आहे.

किरीट सोमय्यांच्या विधानावर आक्षेप कायम

उद्धव ठाकरे हे पक्ष प्रमुख आहेत शिवाय आमचे ते नेते राहिलेले आहेत. त्यामुळे त्यांच्याबद्दल कोणी खालच्या स्तराला जाऊन टीका करणार असेल तरी ती सहन केली जाणार नाही. त्यामुळे याबाबतीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलणे झाले आहे. तर याबाबतची भूमिका ही लवकरच जाहीर केली जाणार असल्याचे केसरकर यांनी सांगितले आहे. एका व्यक्तीची भूमिका ही पक्षाची होऊ शकत नाही. त्यामुळे किरीट सोमय्या यांच्या वक्तव्यामुळे भाजपा पक्षाला दोष देणे हे योग्य नसल्याचेही त्यांनी सांगितले आहे. तर कंगना राणावत याने शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली तेव्हा आपणच आंदोलन केले असल्याची आठवणही केसरकर यांनी करुन दिली आहे.

सोमय्या हे उद्धव ठाकरे यांच्याबाबत बोलणार नाही

किरीट सोमय्या यांनी उद्धव ठाकरे यांचा उल्लेख माफिया असा केला होता. त्यावरुन शिंदे गट चांगलाच आक्रमक झाला आहे. शिवाय प्रवक्ते दीपक केसरकर यांनीही याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि किरीट सोमय्या यांच्याशी बोलणे झाले असल्याचे सांगितले आहे. शिवाय भविष्यात ते उद्धव ठाकरे यांच्याबाबत बोलणार नाहीत असे म्हणाले असल्याचे केसरकर यांनी सांगितले. सध्याच्या नाजूक परस्थितीमध्ये सोमय्या यांच्या वक्तव्यावरुन शिंदे गट आणि शिवसेना यांच्यातील अधिक वाढणार नाही याची काळजी केसरकर हे घेत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळेच त्यांनी सोमय्या प्रकरण अधिक गांभिर्याने हाताळले असल्याचे दिसून येत आहे.

हे सुद्धा वाचा

प्रेमाने जग जिंकता येते

बंडाच्या पहिल्या दिवसापासून दीपक केसरकर यांनी शिंदे गटाची भूमिका मांडण्याचा प्रयत्न केला आहे. शिवाय वाईट शब्द उच्चारल्यानेच या दोन्ही गटातील अंतर वाढत असल्याचे त्यांनी सातत्याने सांगितलेले आहे. आता प्रेमाने जग जिंकता येत असल्याचे ते म्हणत असून अजूनही भाजप आणि शिवसेना युतीला उद्धव ठाकरे हे पाठींबा देतील असा त्यांना आशावाद आहे. तर राज्याची संस्कृती आहे ती जपली पाहिजे, शब्द उच्चारले जातात ते वाईट असतात त्यामुळे अजूनही निर्णय घेण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.