नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाची सुनावणी ( Supreme Court Hearing ) महत्वाच्या टप्प्यावर आली आहे. ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल ( ADV Kapil Sibbal ) हे जोरदार युक्तिवाद करत आहे. याचवेळी कपिल सिब्बल यांनी रेबिया केसच्या ( Rebia Case ) प्रकरणातील विधानसभा अध्यक्षांच्याबाबतीत जो निर्णय घेतला तोच इथेही घ्या असे म्हणत जुन्या अध्यक्षांना परत आणा असा युक्तिवाद केलाय, त्यावर आम्ही अध्यक्षांच्या अधिकारात हस्तक्षेप करणार नाही असे कोर्टाने म्हंटले आहे. त्याच वेळी सिब्बल यांनी 29 जूनच्या सुनावणीत जो निकाल आला त्यावर युक्तिवाद केला आहे.
ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांच्याकडून जोरदार युक्तिवाद केला जात असतांना सुप्रीम कोर्ट हे महत्वाच्या बाबी ठरवत आहे. सुनावणी दरम्यान कपिल सिब्बल यांनी जुन्या अध्यक्षांना पुन्हा नियुक्त करा असे म्हंटले आहे.
सरन्यायाधीश यांनी सिब्बल यांचा युक्तिवाद सुरू असतांना काही मुद्दे नमूद केले आहे. त्यामध्ये आम्ही अध्यक्षांच्या अधिकारात हस्तक्षेप करणार नाही, अशा प्रकरणात कोर्टाने हस्तक्षेप करावा की नाही यावर विचार सुरू झाला आहे.
ठराविक आमदार पक्ष म्हणून घेऊ शकतात का ? पक्षाच्या विरोधात की आमदार निर्णय घेऊ शकतात का ? अशा बाबींवर कोर्ट विचार करत आहे. याच दरम्यान कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद सुरू असतांना तुमचं मान्य केलं तर आमदार अपात्र होऊ शकतात अशी मोठी टिपन्नी कोर्टाने केली आहे.
महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाची दुसऱ्या दिवसाची सुनावणी सुरू असतांना ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल हे दुसऱ्या दिवशीही युक्तिवाद करत आहे. कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद करत असतांना आमदार अपात्र, जुन्या अध्यक्षांना नियुक्त करा आणि उद्धव ठाकरे हेच पक्षाचे निर्णय घेत होते हे पटवून देण्याचा प्रयत्न केला आहे.
यावर कोर्टाने उद्धव ठाकरे हे नंतरच्या काळात आमदार होते. 29 जूनचा निकाल हा बहमतचाचणीच्या पार्श्वभूमीवर अंतरिम होता, बहुमत चाचणी झाली नाही म्हणून तो लागू होत नाही असेही कोर्टाने म्हंटले आहे. एकूणच कोर्टाने महत्वाचे मुद्दे विचारात घेत काही टिपन्न्या केल्या आहेत.
कपिल सिब्बल यांनी जूने संदर्भ देत असतांना उमेश ठाकूर केसचा संदर्भ दिला आहे. याशिवाय एकनाथ शिंदे यांच्यासह भरत गोगावले यांच्या नियुक्त्या चुकीच्या असल्याचा युक्तिवादही कपिल सिब्बल यांनी केला आहे. एकूणच दुसऱ्या दिवसाच्या सुनावणीत जोरदार युक्तिवाद पाहायला मिळत आहे.