मुंबई : निवडणुकांच्या तोंडावर तिकीटासाठी उड्या मारणं नवीन नाही. विधानसभेच्या इतिहासात गेल्या पाच वर्षांच्या टर्ममध्ये सर्वाधिक आमदारांनी राजीनामा देण्याचा विक्रम झाला. तब्बल तीसपेक्षा जास्त जणांनी आमदारकीचा राजीनामा देत पक्षाला रामराम ठोकला. यावेळी जवळपास 30 आयारामांना तिकीट (Incoming Outgoing for Candidature) मिळालं आहे. यातील निम्मी तिकीटं तर भाजपने आयात नेत्यांना दिली. तर शिवसेनेनेही विद्यमानांना डावलून जवळपास दहा आयारामांना उमेदवारी दिली आहे.
राष्ट्रवादीतून आलेले भाजपचे तिकीटधारक
बबनराव पाचपुते – राष्ट्रवादी ते भाजप – श्रीगोंदा, अहमदनगर
वैभव पिचड – राष्ट्रवादी ते भाजप – अकोले, अहमदनगर
राणा जगजितसिंह पाटील – राष्ट्रवादी ते भाजप – तुळजापूर, उस्मानाबाद (मतदारसंघात बदल)
नमिता मुंदडा – (आमदार नाही) – राष्ट्रवादी ते भाजप – केज, बीड
काँग्रेसमधून आलेले भाजपचे तिकीटधारक
जयकुमार गोरे – काँग्रेस ते भाजप – माण, सातारा
कालिदास कोळंबकर – काँग्रेस ते भाजप – वडाळा, मुंबई
राधाकृष्ण विखे पाटील – काँग्रेस ते भाजप – शिर्डी, अहमदनगर
अमल महाडिक – काँग्रेस ते भाजप- कोल्हापूर दक्षिण, कोल्हापूर
नितेश राणे – काँग्रेस ते भाजप – कणकवली, सिंधुदुर्ग
काशिराम पावरा – काँग्रेस ते भाजप – शिरपूर, धुळे
गोपालदास अग्रवाल – काँग्रेस ते भाजप – गोंदिया, गोंदिया
tv9marathi.com
हर्षवर्धन पाटील – माजी आमदार – काँग्रेस ते भाजप – इंदापूर, पुणे
मदन भोसले – माजी आमदार – काँग्रेस ते भाजप – वाई, सातारा
रवीशेठ पाटील – काँग्रेस ते भाजप – पेण, रायगड
भरत गावित – काँग्रेस ते भाजप – नवापूर, नंदुरबार
राष्ट्रवादीतून आलेले शिवसेनेचे तिकीटधारक
पांडुरंग बरोरा – राष्ट्रवादी ते शिवसेना – शहापूर, ठाणे
भास्कर जाधव – राष्ट्रवादी ते शिवसेना – गुहागर, रत्नागिरी
जयदत्त क्षीरसागर – राष्ट्रवादी ते शिवसेना – बीड, बीड
tv9marathi.com
रश्मी बागल – (आमदार नाही) – राष्ट्रवादी ते शिवसेना – करमाळा, सोलापूर
शेखर गोरे – (आमदार नाही) राष्ट्रवादी ते शिवसेना – माण, सातारा
काँग्रेसमधून आलेले शिवसेनेचे तिकीटधारक
अब्दुल सत्तार – काँग्रेस ते शिवसेना – सिल्लोड, औरंगाबाद
भाऊसाहेब कांबळे – काँग्रेस ते शिवसेना – श्रीरामपूर, अहमदनगर
निर्मला गावित – काँग्रेस ते शिवसेना – इगतपुरी, नाशिक
tv9marathi.com Incoming Outgoing for Candidature
दिलीप माने – माजी आमदार – काँग्रेस ते शिवसेना – सोलापूर मध्य, सोलापूर
विलास तरे – बविआ ते शिवसेना – बोईसर, पालघर
शरद सोनावणे – मनसे ते शिवसेना – जुन्नर, पुणे
उलटी गंगा
आशिष देशमुख – भाजप ते काँग्रेस – नागपूर दक्षिण पश्चिम
उदेसिंह पाडवी – भाजप ते काँग्रेस – शहादा, नंदुरबार
बाळासाहेब सानप – भाजप ते राष्ट्रवादी – नाशिक पूर्व, नाशिक
tv9marathi.com
भारत भालके – काँग्रेस ते राष्ट्रवादी – पंढरपूर, सोलापूर
पक्षांतर केलं पण तिकीट नाही
राष्ट्रवादी ते शिवसेना
सचिन अहिर – माजी आमदार, वरळी
अवधूत तटकरे – आमदार, श्रीवर्धन
राष्ट्रवादी ते भाजप
संदीप नाईक – आमदार, ऐरोली
संबंधित इंटरेस्टिंग बातम्या :
विधानसभेसाठी तळ्यातून मळ्यात, तिकीट मिळालेले आयाराम गयाराम