मुंबई : महाविकास आघाडीमधील अनेक नेत्यांची सुरक्षा कमी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. आता यावरून विरोधकांनी राज्य सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. एकीकडे राज्य सरकारने महाविकास आघाडीमधील अनेक नेत्यांच्या सुरक्षेमध्ये कपात केली आहे. मात्र दुसरीकडे ठाकरे गटाचे नेते मिलिंद नार्वेकर (Milind Narvekar) यांची सुरक्षा वाढवण्यात आल्यानं अनेकांच्या भुवया उंचवल्या आहेत. यावरून काँग्रेसचे (Congress) नेते सतेज पाटील (Satej Patil) यांनी राज्य सरकारला जोरदार टोला लगावला आहे. मिलिंद नार्वेकर यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली असेल, असं सतेज पाटील यांनी म्हटलं आहे.
महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांची सुरक्षा कमी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यावरून राज्य सरकारवर सध्या जोरदार टीका सुरू आहे. एकीकडे राज्य सरकारने महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांची सुरक्षा कमी केली आहे. मात्र दुसरीकडे ठाकरे गटाचे नेते मिलिंद नार्वेकर यांच्या सुरक्षिततेत वाढ करण्यात आली आहे. यावरून काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी राज्य सरकारला खोचक टोला लगावला आहे. मिलिंद नार्वेकर यांची सुरक्षा यामुळेही वाढवली असेल, की त्यांना खरच धोका असेल. दुसरं म्हणजे त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी ते कुठे जातात? कोणाला भेटतात हे कळण्यासाठी देखील त्यांची सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली असेल असं सतेज पाटील यांनी म्हलटलं आहे.
काही दिवसांपूर्वी मिलिंद नार्वेकर हे शिंदे गटाच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा सुरू होती. त्यातच नार्वेकर यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यानं चर्चेला उधाण आलं. आता पुन्हा एकदा नार्वेकर यांची सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आल्यानं चर्चेला सुरुवात झाली आहे.