मुंबई : शिवसेना-भाजपमध्ये अपक्ष आमदारांचा पाठिंबा (Independent MLAs Support) मिळवण्यासाठी चढाओढ सुरुच आहे. जळगावातील मुक्ताईनगर मतदारसंघात एकनाथ खडसे यांच्या कन्येला पराभवाची धूळ चारणारे अपक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेला पाठिंबा दर्शवला आहे. चंद्रकांत पाटील यांनी ‘मातोश्री’ निवासस्थानी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेत पाठिंबा (Chandrakant Patil Backs Shivsena) जाहीर केला.
मुक्ताईनगरमधून भाजपने एकनाथ खडसे यांचं तिकीट कापत कन्या रोहिणी खडसे यांना उमेदवारी दिली होती. परंतु नाराज झालेल्या शिवसेनेच्या चंद्रकांत पाटील यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. निवडणुकीत खडसेंच्या कन्येचा निसटता पराभव झाला आणि चंद्रकांत पाटील विधानसभेवर निवडून आले.
मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघातील आमदार चंद्रकांत पाटील जी यांनी मातोश्री निवासस्थानी शिवसेना पक्षप्रमुख मा. श्री. उद्धव साहेब ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेला जाहीर पाठिंबा दिला. pic.twitter.com/Q1g456Z7wA
— ShivSena – शिवसेना (@ShivSena) October 30, 2019
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मुक्ताईनगरमध्ये सभा घेत अपक्ष उमेदवार चंद्रकांत पाटील यांना पाठिंबा जाहीर केला होता. मात्र फक्त राष्ट्रवादी आणि काँग्रेस महाआघाडीच नाही, तर शिवसेना आणि भाजपमधील काही नेते-कार्यकर्त्यांनीही चंद्रकांत पाटील यांच्यासाठी काम केल्याचा आरोप एकनाथ खडसे यांनी केला होता. लेकीच्या पराभवानंतरही खडसे आपल्या मनातील खदखद जाहीरपणे बोलून दाखवत होते.
विधानसभेत आता एक नाही, तर दोन-दोन चंद्रकांत पाटील असतील. पहिले म्हणजे पुण्यातील कोथरुड मतदारसंघातून निवडून आलेले भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील. तर दुसरे, मुक्ताईनगरचे अपक्ष आमदार चंद्रकांत पाटील.
शिवसेनेला आतापर्यंत 7 अपक्ष आमदारांनी पाठिंबा दिला आहे. त्यामुळे शिवसेनेचं संख्याबळ 56 वरुन 63 वर पोहचलं आहे, मात्र भाजपसोबत शिवसेनेचा अजूनही 36 चाच आकडा दिसत आहे.
तर दुसरीकडे इचलकरंजी विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष आमदार प्रकाश आवाडे यांनी भाजपला पाठिंबा दिला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन पाठिंबा जाहीर केला आहे. आतापर्यंत भाजपला एकूण 11 अपक्षांनी पाठिंबा दर्शवल्यामुळे त्याचे संख्याबळ 105 वरुन 116 वर पोहोचले आहे.
भाजपला पाठिंबा दिलेले आमदार
शिवसेनेला पाठिंबा दिलेले आमदार
यांचा पाठिंबा कोणाला?
कोणालाही बहुमत नाही
विधानसभा निवडणुकीत भाजपने 288 पैकी 105 जागांसह सर्वात मोठा पक्ष होण्याचा मान मिळवला. मात्र कोणत्याही एका पक्षाला 145 हा सत्तास्थापनेच्या आकडा गाठता आलेलं नाही. शिवसेना 56 जागांसह दुसऱ्या, राष्ट्रवादी 54 जागांसह तिसऱ्या, काँग्रेस 44 जागांसह चौथ्या स्थानावर आहे. त्यामुळे सत्ता स्थापन्यासाठी कोणत्या ना कोणत्या पक्षाचा पाठिंबा घ्यावाच लागणार आहे.
आघाडीकडून मंत्रिपद भूषवलेल्या आमदाराचा भाजपला पाठिंबा
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 पक्षीय बलाबल (Maharashtra Vidhansabha Election Partywise Result)
महायुती – 162
(भाजप (105), शिवसेना (56), रासप (01), रिपाइं, रयत क्रांती संघटना, शिवसंग्राम)
महाआघाडी – 105
(राष्ट्रवादी (54), काँग्रेस (44), बहुजन विकास आघाडी (03), शेकाप (01) <भाजपला पाठिंबा>, स्वाभिमानी (01), समाजवादी पक्ष (02)
Chandrakant Patil Backs Shivsena