मुंबई : शिवसेना-भाजपमध्ये अपक्ष आमदारांचा पाठिंबा (Independent MLAs Support) मिळवण्यासाठी चढाओढ सुरु आहे. शिवसेनेला आतापर्यंत 5 अपक्ष आमदारांनी पाठिंबा (Independent MLAs Support) दिला आहे. त्यामुळे शिवसेनेचं (Shiv Sene BJP) संख्याबळ 61 वर पोहोचलं आहे. तर दुसरीकडे भाजपलाही 8 अपक्षांनी पाठिंबा (Shiv Sene BJP) दर्शवल्यामुळे त्यांचं संख्याबळ 105 वरुन 113 जागांवर पोहोचलं आहे.
दोन अपक्षांनी आज भाजपला पाठिंबा दर्शवला. रायगडमधील उरण विधानसभेतील अपक्ष आमदार महेश बालदी यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेत, पाठिंबा जाहीर केला. याशिवाय गोंदियातील अपक्ष आमदार विनोद अग्रवाल यांनीही भाजपला समर्थन दर्शवलं.
यापूर्वी अपक्ष आमदार गीता जैन, अपक्ष आमदार किशोर जोरगेवार, युवा स्वाभिमान पक्षाचे आमदार रवी राणा, अपक्ष आमदार राजेंद्र राऊत, श्यामसुंदर शिंदे आणि रत्नाकर गुट्टे यांनी भाजपला पाठिंबा दिला आहे.
भाजपला पाठिंबा देणारे अपक्ष आमदार
शिवसेनेला पाठिंबा दिलेले अपक्ष, बंडखोर आमदार
अद्याप कोणालाही पाठिंबा न दिलेले अपक्ष आमदार
यांचा कोणाला पाठिंबा?
कोणालाही बहुमत नाही
विधानसभा निवडणुकीत भाजपने 288 पैकी 105 जागांसह सर्वात मोठा पक्ष होण्याचा मान मिळवला. मात्र कोणत्याही एका पक्षाला 145 हा सत्तास्थापनेच्या आकडा गाठता आलेलं नाही. शिवसेना 56 जागांसह दुसऱ्या, राष्ट्रवादी 54 जागांसह तिसऱ्या, काँग्रेस 44 जागांसह चौथ्या स्थानावर आहे. त्यामुळे सत्ता स्थापन्यासाठी कोणत्या ना कोणत्या पक्षाचा पाठिंबा घ्यावाच लागणार आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 पक्षीय बलाबल (Maharashtra Vidhansabha Election Partywise Result)
महायुती – 162
(भाजप (105), शिवसेना (56), रासप (01), रिपाइं, रयत क्रांती संघटना, शिवसंग्राम)
महाआघाडी – 105
(राष्ट्रवादी (54), काँग्रेस (44), बहुजन विकास आघाडी (03), शेकाप (01), स्वाभिमानी (01), समाजवादी पक्ष (02)