“ये गांधी का वंशज है ईडी इसे रोक नहीं पायेगी, सत्याची लढाई केवळ राहुल गांधींच जिंकणार!”

| Updated on: Jun 13, 2022 | 11:51 AM

राहुल गांधी यांनी ईडीने चौकशीसाठी बोलवलं आहे. त्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटनरून एक व्हीडिओ शेअर करण्यात आला आहे

ये गांधी का वंशज है ईडी इसे रोक नहीं पायेगी, सत्याची लढाई केवळ राहुल गांधींच जिंकणार!
Follow us on

मुंबई : राहुल गांधी आणि सोनिया गांधी (Rahul Gandhi) यांना ईडीची नोटीस (ED Notice) आल्यानंतर काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. देशभर त्यांचा आक्रोश पहायला मिळतोय. तर दुसरीकडे काँग्रेसच्या (Congress) ट्विटर अकाऊंटवरून एक व्हीडिओ शेअर करण्यात आलाय. “राहुल हे गांधींचे वंशज आहेत, त्यांना ईडी रोखू शकत नाही. सत्याची लढाई केवळ राहुल गांधींच जिंकणार!”, असं काँग्रेसच्या ट्विटमध्ये म्हणण्यात आलं आहे.

काँग्रेसचं ट्विट

राहुल गांधी यांनी ईडीने चौकशीसाठी बोलवलं आहे. त्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटनरून एक व्हीडिओ शेअर करण्यात आला आहे. “हुकुमशाह कान उघडून ऐका, राहुल गांधी गांधी घराण्याचे वंशज आहेत. त्यांना तुम्ही रोखू शकत नाही. सत्याच्या लढाईत तुम्ही कधीच राहुल गांधी यांच्याशी जिंकू शकत नाही”, असं ट्विट करण्यात आलं आहे.

हे सुद्धा वाचा

काँग्रेसने शेअर केलेल्या व्हीडिओमध्ये हुकुमशाहीचा उल्लेख करण्यात आलाय. “इतिहासाची पानं चाळल्यास लक्षाता येईल की हुकुमशाहाला सत्य कधी पटलं नाही. त्याने कायम सत्याचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला. सध्याही तसंच घडतंय. हुकुमशाहाच्या रुपाने मोदी सत्तेत आहेत आणि सत्याच्या रूपात राहुल गांधी जनतेसोबत उभे आहेत. मोदींना राहुल गांधी यांचं सत्य आणि जनतेसोबत उभं राहणं रुचत नाहीये”, असं या ट्विटमध्ये म्हटलंय.

गांधी घराण्याचा इतिहास

देशाच्या स्वातंत्र्यानंतर जवळपास 70 सत्तेत राहिलेल्या काँग्रेस पक्षाचे राहुल गांधी नेते आहेत. ते देशाच्या पहिल्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे नातू तसंच देशाचे पहिले पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरू यांचे पणतू आहेत. राहुल यांचे पिता राजीव गांधी देखील देशाचे पंतप्रधान राहिले आहेत.