कोलकाता : मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर सर्वात अगोदर पोस्टल मतांची मोजणी केली जाते. यावर्षी मोठ्या प्रमाणात पोस्टल मतं आहेत. पश्चिम बंगालमध्ये सुरुवातीचेच कल भाजपच्या बाजूने आले आहेत. इथे यावेळी मतदानाच्या काळात मोठ्या प्रमाणात हिंसाचार झालाय. भाजप आणि ममता बॅनर्जी यांच्या टीएमसीमध्ये बंगालमध्ये लढत आहे. सुरुवातीचेच कल भाजपच्या बाजूने आल्यामुळे बंगालमधील रंगत वाढली आहे. भाजपने इथे किमान 23 जागा येतील, असा दावा यापूर्वी केला होता.
पश्चिम बंगाल लोकसभा मतदारसंघांच्या संख्येनुसार देशात उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रानंतर तिसऱ्या क्रमांकावर आहे. 42 मतदारसंघ असलेल्या बंगालमध्ये भाजपने 23 जागा जिंकण्याचं लक्ष्य ठेवलंय. 2014 ला भाजपने बंगालमध्ये केवळ 2 जागा जिंकल्या होत्या. तर टीएमसीने 36 जागांवर विजय मिळवला होता. यावेळी भाजपने मोठ्या प्रमाणात आव्हान निर्माण केलंय.
एक्झिट पोलमध्ये भाजपला बंगालमध्ये मोठ्या प्रमाणात यश मिळताना दाखवण्यात आलंय. भाजपला 15 ते 20 जागा दाखवण्यात आल्या आहेत, तर टीएमसीला यावेळी मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याचा अंदाज आहे. भाजपाध्यक्ष अमित शाह यांनी 2014 च्या निकालानंतरच बंगालमध्ये रणनीती आखण्यास सुरुवात केली होती.
निकाल लाईव्ह पाहा :