नवी दिल्ली : क्रिकेटमधील दिग्गज नामवंत खेळाडू इरफान पठाण (Irfan Pathan) आणि गौतम गंभीर (gautam gambhir) नुपूर शर्माच्या वक्तव्यावर बोलले आहेत. प्रेषित मुहम्मद यांच्यावरील भाजपच्या माजी प्रवक्त्याच्या वादग्रस्त विधानानंतर भारतातील अनेक शहरांमध्ये निदर्शनं झाली आणि काही ठिकाणी त्यांचे पुतळे जाळण्यात आले. एवढेच नाही तर तिला जीवे मारण्याच्या धमक्याही आल्या आहेत. यापूर्वी नुपूरनं (Nupur Sharma) माफी देखील मागितली आहे. नुपूरची भाजप पक्षाच्या सदस्यत्वातून हकालपट्टी करण्यात आली आहे. मात्र, देशातील काही सुजाण नागरिकांमुळे हे प्रकरण दिवसेंदिवस मोठे होत आहे. प्रेषित मोहम्मद यांच्या विरोधात आक्षेपार्ह टिप्पणी भाजपच्या प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी केली होती. त्यानंतर भाजप खासदार आणि माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर यांनी त्यावर भाष्य केलंय. विशेष म्हणजे यावर इरफान पठाणही बोलला आहे. त्यांनी ट्विट करत आपलं मत मांडलं आहे.
शर्माला पाठिंबा देत गंभीरने ट्विट केले की, ‘माफी मागणाऱ्या महिलेविरुद्ध देशभरात द्वेषाचे भयंकर प्रदर्शन आणि तिला जीवे मारण्याची धमकी देणाऱ्यांवर तथाकथित ‘सेक्युलर लिबरल’चे मौन वेडे ठरणार आहे.’
Silence of so called ‘secular liberals’ on the sickening display of hatred & death threats throughout the country against a woman who has apologised is surely DEAFENING! #LetsTolerateIntolerance
— Gautam Gambhir (@GautamGambhir) June 12, 2022
Violence is not the answer no matter what the provocation is!
— Irfan Pathan (@IrfanPathan) June 12, 2022
टीव्हीवरील चर्चेदरम्यान नुपूर शर्मा यांनी केलेल्या कथित आक्षेपार्ह विधानाला अनेक मुस्लिम संघटनांनी विरोध केला होता. हा वाद चिघळू नये, या विचाराने भाजपने शर्मा यांना पक्षातून निलंबित केले होते. मात्र, असे असतानाही शर्मा यांच्याविरोधात देशातील अनेक शहरांमध्ये निदर्शने सुरू आहेत. काही अतिरेक्यांनी त्याला जीवे मारण्याची धमकीही दिली आहे. ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (MIM) खासदार इम्तियाज जलील यांनी शर्मा यांना फाशी देण्याची मागणी केली होती.