कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे पश्चिम महाराष्ट्रातील बडे नेते आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्या घरावर आयकर विभागाने धाडी टाकल्या. आज पहाटे आयकर विभागाची टीम मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्या कागल येथील निवासस्थानी दाखल झाली. हसन मुश्रीफ यांच्या साखर कारखान्यांवर देखील छापा टाकल्याची माहिती मिळत आहे.
राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार असलेले हसन मुश्रीफ हे राष्ट्रवादी काँग्रेसचे कोल्हापूर जिल्ह्यातील मोठे नेते आहेत. त्यांच्या घरावर आयकर विभागाने छापेमारी केल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
पुण्यातील घरीही छापेमारी
दरम्यान, आयकर विभागाने केवळ कोल्हापुरातच नव्हे तर हसन मुश्रीफ यांच्या पुण्यातील घरीही छापेमारी केली. हसन मुश्रीफ यांचा मुलगा साजिद मुश्रीफ यांच्या कोंढव्यातील घरावर आयकर विभागाने छापा टाकला. मुश्रीफ यांच्या पुण्यातील दोन घरांवर आयकर विभागाने छापे टाकले. एकूण दोन टीम कोंढाव्यातील घरी आले. सकाळी 7 वाजल्यापासून घरातील कागदपत्रांची तपासणी केली जात आहे.
आयकर विभागाने नेमक्या कोणत्या कारणास्तव ही छापेमारी केली आहे, याबाबतची माहिती अद्याप समजू शकलेली नाही. गेल्या काही दिवसापासून विविध जिल्ह्यात आयकर विभागाची छापेमारी सुरु आहे. नगर, औरंगाबादमध्ये आयकर विभागाने शिक्षण संस्थांवर छापे टाकले होते. त्यानंतर आयकर विभागाचा मोर्चा आता कोल्हापूरकडे वळल्याचं आजच्या कारवाईतून दिसून येत आहे.
कोण आहेत हसन मुश्रीफ?
संबंधित बातम्या
कोल्हापुरातून हसन मुश्रीफांना तिकीट नाहीच!
महाडिकांचं भाषण मुश्रीफांच्या कार्यर्त्यांनी रोखलं, हात धरुन ओढून पुन्हा भाषणासाठी आणलं