मुंबई: राज्यातील जनता महाविकासआघाडी सरकारच्या कामावर समाधानी आहे. त्यामुळे महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करणे अशक्य आहे, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसे नेते (NCP) आणि मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी केले. नारायण राणे यांनी आधी सरकार टिकणार नाही, फाटाफूट होऊन भाजपची सत्ता येईल, असे म्हटले. जवळपास 15 महिने झाल्यानंतर त्यांनी हा बाजा वाजवणं बंद केले. आता ते पुन्हा महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी करणार आहेत. कारण, भाजपकडे दुसरा पर्याय नाही पण हे अशक्य आहे. कोणत्याही राज्यात अशीच कुणालाही राष्ट्रपती राजवट लागू करता येत नाही, असे नवाब मलिक यांनी म्हटले. (NCP leader Nawab Malik salms BJP leader Narayan Rane)
मोहन डेलकर आत्महत्याप्रकरणात मुख्यमंत्र्यांनी पत्रकारपरिषद घेतली. डेलकर यांनी लिहलेल्या सुसाईड नोटमध्ये बऱ्याच लोकांची नावं आहेत. पोलीस त्यांचा तपास करत आहेत. यामध्ये भाजप नेत्यांचाही समावेश आहे. याप्रकरणातील सत्य लवकरच समोर येईल. मात्र, हा तपास रोखण्यासाठी दबाव आणू नका. यंत्रणांना त्यांचं काम करुन दिलं पाहिजे, असा टोला नवाब मलिक यांनी काँग्रेसला लगावला. तसेच मनसुख हिरेन प्रकरणातही सत्य लवकरच समोर येईल. तोपर्यंत कोण काय बोलतंय, यावर विश्वास ठेवू नका, असेही नबाव मलिक यांनी म्हटले.
नारायण राणे यांनी शनिवारी मुंबईत घेतलेल्या पत्रकारपरिषदेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकासआघाडीवर टीकास्त्र सोडले होते. राज्यात कायदा आणि सुव्यवस्था शिल्लक नाही. कुणाचे मुडदे कुठेही पडू शकतात अशी स्थिती आहे. त्यामुळे नारायण राणे लवकर केंद्रातील नेत्यांची भेट घेऊन महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवटीची मागणी करणार असल्याची चर्चा आहे.
संबंधित बातम्या:
शरद पवारांचा कुटुंबियांसोबत डिनर टाईम; फोटो व्हायरल!
‘अब तो एक ढुंढो हजार मिलते है’; राणेंचा उद्धव ठाकरे- आदित्य यांच्यावर नाव न घेता ‘प्रहार’
‘हे शिवसैनिकांचे नाही तर फक्त ‘मातोश्री’चे राज्य’, नारायण राणेंचं मुख्यमंत्र्यांवर शरसंधान
(NCP leader Nawab Malik salms BJP leader Narayan Rane)