जगनमोहन रेड्डींकडून आशा कर्मचाऱ्यांच्या पगारात तिप्पट वाढ

| Updated on: Jun 03, 2019 | 7:02 PM

हैदराबाद : आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी मुख्यमंत्री पदावर रुजू होताच मोठा निर्णय घेतला आहे. रेड्डी यांनी आरोग्य विभागात काम करणाऱ्या आशा कर्माचाऱ्यांच्या पगारात तिप्पट वाढ केली आहे. मुख्यमंत्री रेड्डी यांनी आशा कर्मचाऱ्यांचा पगार वाढवून 10 हजार केला आहे. आशा कर्मचाऱ्यांचा सध्या पगार 3 हजार रुपये आहे. दरम्यान पगारवाढीनंतर आशा कर्मचाऱ्यांचा पगार 7 हजार […]

जगनमोहन रेड्डींकडून आशा कर्मचाऱ्यांच्या पगारात तिप्पट वाढ
Follow us on

हैदराबाद : आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी मुख्यमंत्री पदावर रुजू होताच मोठा निर्णय घेतला आहे. रेड्डी यांनी आरोग्य विभागात काम करणाऱ्या आशा कर्माचाऱ्यांच्या पगारात तिप्पट वाढ केली आहे. मुख्यमंत्री रेड्डी यांनी आशा कर्मचाऱ्यांचा पगार वाढवून 10 हजार केला आहे. आशा कर्मचाऱ्यांचा सध्या पगार 3 हजार रुपये आहे. दरम्यान पगारवाढीनंतर आशा कर्मचाऱ्यांचा पगार 7 हजार रुपयांनी वाढणार आहे.

नुकतंच 30 मे रोजी जगनमोहन रेड्डी यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. राज्यपाल ईएसएल नरसिम्हन यांनी 46 वर्षाच्या जगनमोहन रेड्डी यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. जगनमोहन यांच्या वायएसआर काँग्रेस पक्षाने नुकतेच 175 सदस्य असलेल्या विधानसभा निवडणुकीत 151 जागांवर विजय मिळवला आहे.

यावेळी विधानसभा निवडणूक आणि लोकसभा निवडणुकीत त्यांचा पक्ष वायएसआर काँग्रेसने मोठं यश मिळवलं आहे. राज्यात लोकभेच्या एकूण 25 आणि विधानसभेच्या एकूण 176 जागा आहेत. तसेच त्यांच्या पक्षाने राज्याच्या 25 लोकसभा जागांपैकी 22 जागांवर विजय मिळवला आहे

तेलगू भाषेतून शपथ

रेड्डी यांनी विजयवाडच्या आयजीएमसी स्टेडिअसमधील आयोजित कार्यक्रमात नेते आणि कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत दुपारी 12 वाजून 23 मिनीटांनी तेलगू भाषेत शपथ घेतली. वायएसआर काँग्रेस यांनी चंद्राबाबू नायडू यांच्या टीडीपीचा पराभव केला आहे.