Rajya Sabha | मोठी बातमी : राज्यसभेत जय हिंद, वंदे मातरम शब्दांवर बंदी, सदस्यांसाठी नवे नियम जारी

| Updated on: Nov 30, 2023 | 4:03 PM

संसदेचे हिवाळी अधिवेशन चार डिसेंबरपासून सुरु होत आहे. या अधिवेशनासाठी राज्यसभा सदस्यांसाठी नवी नियमावली जारी करण्यात आली आहे. ही नियमावली सर्व खासदारांसाठी जाहीर केली आहे. यात अनेक नवीन कडक नियमांचा समावेश आहे.

Rajya Sabha | मोठी बातमी : राज्यसभेत जय हिंद, वंदे मातरम शब्दांवर बंदी, सदस्यांसाठी नवे नियम जारी
SANSAD BHAVAN
Follow us on

संदीप राजगोलकर , नवी दिल्ली | 30 नोव्हेंबर 2023 : संसदेचे हिवाळी अधिवेशन चार डिसेंबरपासून सुरु होत आहे. या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राज्यसभेच्या सभागृहातील सदस्यांसाठी अनेक नव्या नियमांची नियमावली जारी करण्यात आली आहे. यानुसार आता राज्यसभा सभागृहात कोणत्याही सदस्याला जय हिंद, वंदे मातरम हे शब्द बोलता येणार नाहीत. तसेच, कोणताही राज्यसभा खासदार 60 दिवस किंवा त्यापेक्षा अधिक दिवस सभागृहात अनुपस्थित राहिल्यास त्याची जागा कायमस्वरूपी रिकामी होणार आहे.

राज्यसभा कार्यालयाने ही नियमांची यादी जारी केली आहे. यामध्ये एकाच वेळी दोन सदस्यांना जागेवरून उठून प्रश्न विचारता येणार नाही. राज्यसभेत उपस्थित केले जाणारे प्रश्न सार्वजनिक केले जाणार नाहीत. तसेच, राज्यसभेच्या सभागृहात कोणत्याही प्रकारचे फलक झळकवण्यास बंदी घालण्यात अली आहे.

राज्यसभेचे सभापती बोलत असताना सभागृहातील कोणत्याही सदस्याला सभागृह सोडून जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. राज्यसभा सदस्यांना लिखित भाषण वाचता येणार नाही. राज्यसभेतील कार्यवाही सुरू असताना व्हिडिओग्राफी करायला बंदी केली आहे. यासोबतच संपूर्ण संसद परिसरामध्ये धूम्रपान करण्यास बंदी घालण्यात आली आहे.

हे सुद्धा वाचा

अशी आहे नवी नियमावली

1. राज्यसभेत उपस्थित केलेल्या मुद्द्यांची कोणतीही प्रसिद्धी करण्यात येऊ नये.

2. राज्यसभा सभापती नोटीस मंजूर करत नाही. इतर खासदारांना कळवत नाही तोपर्यंत ती नोटीस सार्वजनिक करू नये.

3. आत्तापर्यंत खासदार विशेषत: विरोधी पक्षाचे खासदार राज्यसभेत कोणताही महत्त्वाचा मुद्दा मांडण्यासाठी नोटीस देत असत पण आता असे होणार नाही.

4. सभागृहात धन्यवाद, आभार, जय हिंद, वंदे मातरम अशा घोषणा देऊ नयेत.

5. सभापती यांनी दिलेल्या व्यवस्थेवर सभागृहाच्या आत किंवा बाहेर टीका करू नये.

6. सभागृहात फलक, पोस्टर, बॅनर्स आणायला आणि लावायला बंदी आहे.

7. सभापती यांना सदस्यांनी पाठ दाखवून बाहेर जाऊ नये.

8. सभापती बोलत असताना कोणत्याही सदस्याने सभागृह सोडू नये.

9. सभापती बोलत असताना सभागृहात शांतता असावी.

10. सभागृहात दोन सदस्य एकाचवेळी उभे राहू शकत नाहीत.

11. सदस्यांनी थेट सभापती यांच्याशी संपर्क साधू नये. ते सहाय्यक यांच्यामार्फत स्लिप पाठवू शकतात.

12. सदस्यांनी सभागृहात लिखित भाषण वाचू नये.