जयदेव ठाकरे यांचा पाठिंबा कुणाला? मतदानानंतर पहिली प्रतिक्रिया

| Updated on: Jul 05, 2019 | 3:57 PM

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Elections 2019) चौथ्या टप्प्यासाठी आज राज्यातील 17 मतदारसंघांमध्ये मतदान होतंय. यामध्ये मुंबईतील सर्व जागांचा समावेश आहे. अनेक सेलिब्रिटींनी सकाळपासूनच रांगेत उभं राहून मतदानाचा हक्क बजावला. या टप्प्यात एकूण 3 कोटी 11 लाख 92 हजार 823 मतदार मतदानाचा हक्क बजावतील. नंदुरबार, धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मावळ, शिरुर, शिर्डी, […]

जयदेव ठाकरे यांचा पाठिंबा कुणाला? मतदानानंतर पहिली प्रतिक्रिया
Follow us on

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Elections 2019) चौथ्या टप्प्यासाठी आज राज्यातील 17 मतदारसंघांमध्ये मतदान होतंय. यामध्ये मुंबईतील सर्व जागांचा समावेश आहे. अनेक सेलिब्रिटींनी सकाळपासूनच रांगेत उभं राहून मतदानाचा हक्क बजावला. या टप्प्यात एकूण 3 कोटी 11 लाख 92 हजार 823 मतदार मतदानाचा हक्क बजावतील. नंदुरबार, धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मावळ, शिरुर, शिर्डी, उत्तर मुंबई, उत्तर-पश्चिम मुंबई, उत्तर-पूर्व मुंबई, उत्तर-मध्य मुंबई, दक्षिण-मध्य मुंबई, दक्षिण मुंबई या 17 लोकसभा मतदारसंघात मतदान सुरु आहे.

मुंबईत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे बंधू जयदेव ठाकरे यांनीही मतदानाचा हक्क बजावला. जयदेव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबीयांनी नवजीवन विद्यामंदिर वांद्रे पूर्व येथे मतदानाचा हक्क बजावला. त्यांचा पाठिंबा कुणाला याबाबत त्यांना मतदानानंतर प्रतिक्रिया विचारण्यात आली. यंदाची निवडणूक वेगळी होती, असं म्हणत त्यांनी जास्तीत जास्त प्रमाणात मतदान करण्याचं आवाहन केलंय. शिवाय अशा उमेदवाराला मतदान करा जो पुढेही तुमच्या कामासाठी उपलब्ध असेल, असं ते म्हणाले.

दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मोदी-शाह मुक्त भारतासाठी राज्यभर दहा सभा घेतल्या. याबाबतही जयदेव ठाकरेंना प्रतिक्रिया विचारण्यात आली. पण मोदी-शाह मुक्त भारतावर मी काही बोलणार नाही, असं ते म्हणाले. जे काही मुद्दे, आरोप-प्रत्यारोप झाले ते सर्व जनतेने पाहिले. कुणाला पाठिंबा द्यावा हे जनतेने ठरवावे. राज ठाकरेंनी त्यांचे मुद्दे, मते मांडली. बाकी लोक ठरवतील, असंही ते म्हणाले.

VIDEO : पाहा जयदेव ठाकरे यांच्याशी बातचीत