जळगाव : जळगाव भाजपा जिल्हाध्यक्ष निवडीच्या बैठकीत (Jalgaon BJP Rada) राडा झाला आहे. भाजप खासदार रावसाहेब दानवे आणि राज्याचे माजी मंत्री गिरीश महाजन यांच्यासमोर कार्यकर्ते भिडले, शिवाय कार्यकर्त्यांनी शाईफेकही (Jalgaon BJP Rada) केली. याआधीही अंमळनेरमध्ये विधानसभा निवडणुकीपूर्वी गिरीश महाजन यांच्यासमोर मंचावर हाणामारी झाली होती. त्यामुळे जळगाव भाजप आणि राडेबाजी हे सूत्रच झाल्याचं चित्र आहे.
दरम्यान, जळगाव भाजपा जिल्हाध्यक्ष निवडीसाठी आज महत्त्वाची बैठक होती. या बैठकीला रावसाहेब दानवे आणि राज्याचे माजी मंत्री गिरीश महाजन हे उपस्थित होते. मात्र एकनाथ खडसेच बैठकीला नव्हते.
जिल्ह्यातील सर्व प्रमुख कार्यत्यांच्या बैठकीमध्ये जळगाव जिल्हाध्यक्षांची घोषणा होणार होती. जळगाव भाजपा जिल्ह्यातील कार्यकर्त्यच्या नावांच्या यादीत एक जण जिल्हाअध्यक्ष म्हणून निवडला जाणार होता. मात्र त्याआधीच हा राडा झाला.
विधानसभा निवडणुकीपूर्वी देखील भाजपचा असाच अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला होता. भाजपचे दिवंगत जळगाव जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांच्या समर्थकांनी भाजपचेच माजी आमदार बी एस पाटील यांना मंचावरच मारहाण केली होती. खान्देशात खडसे समर्थक आणि महाजन समर्थक असे दोन गट पडले आहेत.