जळगाव : जिल्हा बँकेची निवडणूक स्वबळावर लढवण्याच्या चाचपणीसाठी भाजपच्या कोअर कमिटीची बैठक सुरु आहे. ही बैठक भाजप नेते गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली अजिंठा शासकीय विश्रामगृहात सुरु आहे. या बैठकीला भाजपचे खासदार उन्मेष पाटील, भाजप खासदार रक्षा खडसे, भाजप आमदार सुरेश भोळे, संजय सावकारे, माजी आमदार स्मिता वाघ यांच्यासह जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित आहेत.
काल (16 ऑक्टोबर) झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत काँग्रेसने भाजपसोबत निवडणूक लढवण्यास स्पष्ट नकार दिला. काँग्रेसच्य या भूमिकेमुळे भाजपने आता स्वबळाची तयारी केली आहे. भाजपने सर्व 21 जागा लढवण्याचा निर्णय घेतला आहे. आजच्या बैठकीत उमेदवारी संदर्भात निर्णय होणार आहे. महापालिका निवडणुकीप्रमाणे जिल्हा बँकेतही विरोधकांना धक्कातंत्र देण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. बंददाराआड ही बैठक सुरु आहे.
याआधी अजिंठा विश्रामगृहावर 16 ऑक्टोबर रोजी सर्वपक्षीय नेत्यांची बैठक झाली. पालकमंत्री गुलाबराव पाटील, भाजप नेते गिरीश महाजन, राष्ट्रवादी नेते तथा माजी मंत्री गुलाबराव देवकर राष्ट्रवादी नेते तथा माजी आमदार सतीष पाटील, काँग्रेसचे आमदार शिरीष चौधरी शिवसेनेचे आमदार किशोर पाटील आदी नेते बैठकीला उपस्थित होते. या बैठकीत काँग्रेसने भाजपसोबत जाण्यास स्पष्ट शब्दांत नकार दिला. त्यामुळे या बैठकीत कोणताही ठोस निर्णय होऊ शकला नव्हता. काँग्रेस नेत्यांनी ही निवडणूक महाविकास आघाडी म्हणून लढवण्याची भूमिका मांडली होती.
दरम्यान काँग्रेसचे स्वबळाचा नारा दिल्यावर भाजपनेसुद्धा स्वतंत्र लढण्याचा निश्चय केला आहे. भाजप सर्व जागा स्वबळावर लढवण्याची शक्यता आहे. तशी तयारी भाजपने केली आहे. सर्व 21 जागा लढवण्यासाठी काय रचना असावी, काय करता येईल ? या सर्व गोष्टींवर भाजपच्या आजच्या बैठकीत चर्चा केली जाणार आहे. या बैठकीत नेमका कोणता निर्णय घेतला जाईल हे पाहणे महत्त्वाचे आहे.
इतर बातम्या :
Lookalike : हुबेहूब जॅकलिनसारखी दिसते ‘ही’ अभिनेत्री, फोटो पाहून ओळखणे होईल कठीणhttps://t.co/8wrEpUXyDH#JacquelineFernandez #Lookalike
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 17, 2021
(jalgaon district bank election congress going to contest independently bjp call meeting under girish mahajan)