Gram Panchayat Breaking | धक्कादायक!! जळगावात निवडणूक निकालानंतर राडा, 25 वर्षीय भाजप कार्यकर्त्याचा मृत्यू

| Updated on: Dec 20, 2022 | 3:43 PM

दोन गटातील हाणामारीत एक भाजपचा (BJP) कार्यकर्ता गंभीर जखमी झाला. दुर्दैवाने यात त्याचा मृत्यू झाला आहे.

Gram Panchayat Breaking | धक्कादायक!! जळगावात निवडणूक निकालानंतर राडा, 25 वर्षीय भाजप कार्यकर्त्याचा मृत्यू
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

जळगावः राज्यभरात ग्रामपंचायत निवडणूक (Gram Panchayat Election) निकालांनंतर जल्लोष (Celebration) सुरु असतानाच जळगावातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. निवडणूक निकालानंतर दोन गट आमने-सामने आले. दोन्ही गटातील कार्यकर्ते परस्परांत भिडले. यावेळी दोन समुहांकडून दगडफेक देखील करण्यात आली. या प्रकारात एक भाजपचा (BJP) कार्यकर्ता गंभीर जखमी झाला. दुर्दैवाने यात त्याचा मृत्यू झाला आहे.

कुठे घडली घटना?

जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील टाकळी येथे ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालानंतर दोन गटात शाब्दिक वाद झाले. त्यानंतर कार्यकर्त्यांनी परस्परांवर दगडफेक सुरु केली. या दगडफेकीत अनेक कार्यकर्ते जखमी झाले. त्यातील भाजपचा धनराज माळी नावाचा २५ वर्षीय कार्यकर्ता गंभीर जखमी झाला.

कार्यकर्त्यांनी जखमीला तत्काळ सरकारी रुग्णालयात नेले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर जळगावात खळबळ माजली आहे.

जवळच्या कार्यकर्त्याचा असा एकाएकी मृत्यू झाल्याने इतर कार्यकर्त्यांनी रुग्णालयातच टाहो फोडला.

जळगाव जिल्ह्यातील 123 ग्रामपंचायतींचे निकाल आज समोर येत आहेत. 899 जागांसाठी ही निवडणूक होत आहे, त्यात 784 जागा सदस्य पदासाठी तर 115 जागा सरपंच पदाच्या आहेत.

मोहाडी ग्रामपंचायतीचा निकाल काय?

संपूर्ण राज्याचं लक्ष लागून असलेल्या जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यात असल्यामुळे मोहाडी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत गुजरात भाजपचे प्रदेशाध्यक्ष सी आर पाटील यांच्या कन्या भाविनी पाटील या विजयी झाल्या.

मात्र त्यांचे ग्रामविकास पॅनल पराभूत झाले आहे. भाविनी पाटील यांच्या पॅनलला भाजप प्रणितच लोकशाही उन्नती पॅनलने पराभवाचा धक्का दिला, या निवडणुकीत धनशक्ती विरुद्ध जनशक्तीचा विजय झाला.

गेल्या पाच वर्षात गावाने जी हुकूमशाही पाहिली त्याचा अस्त झाल्याची प्रतिक्रिया लोकशाही उन्नती पॅनलचे प्रमुख शरद पाटील यांनी दिली.