Raksha Khadse : लोकसभा निवडणुकीवर रक्षा खडसे यांचं मोठं वक्तव्य; म्हणाल्या, माझे विचार…

| Updated on: Oct 21, 2023 | 8:30 AM

BJP MP Raksha Khadse on Loksabha Election 2024 : मी एकनाथ खडसे ची सून म्हणून नाही, तर...; लोकसभा निवडणुकीवर रक्षा खडसे यांचं मोठं विधान, आगामी लोकसभा निवडणुकीवर रक्षा खडसे यांनी सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे. पक्षांतराच्या चर्चेवरही त्यांनी भाष्य केलं आहे.

Raksha Khadse : लोकसभा निवडणुकीवर रक्षा खडसे यांचं मोठं वक्तव्य; म्हणाल्या, माझे विचार...
Follow us on

रवी गोरे, प्रतिनिधी – टीव्ही 9 मराठी, जळगाव | 21 ऑक्टोबर 2023 : लोकसभा निवडणुकीला अवघे काही महिने उरलेले आहेत. अशातच या निवडणुकीत कुणासा उमेदवारी मिळणार? याची जोरदार चर्चा रंगतेय. रावेर लोकसभा मतदारसंघाची जोरदार चर्चा होतेय. एकीकडे एकनाथ खडसे हे राष्ट्रवादीत आहेत. शिवाय त्यांची कन्या रोहिणी खडसे यांच्याकडे महिला राष्ट्रवादी काँग्रेसचं प्रदेशाध्यक्षपद आहे. अशात आता रक्षा खडसे यांची भूमिका काय असेल? अशी चर्चा होतेय. निवडणुकीच्या तोंडावर त्या पक्षांतर करतील अशी चर्चा आहे. या सगळ्यावर खासदार रक्षा खडसे यांनी आपली भूमिका मांडली आहे. tv9 मराठीला त्यांनी एक्सक्लुझिव्ह प्रतिक्रिया दिलीय.

एकनाथ खडसे हे नाव माझ्या पाठीमागे असल्याने मला जर लोक डावलत असतील, तर हे चुकीचं आहे. मी एकनाथ खडसेंची सून म्हणून माझी ओळख ठेवलेली नाही. रक्षा खडसे हे नाव लोकांमध्ये आज पोहोचलेलं आहे. लोकांसाठी मी काम करतेय. खरंतर खडसे हे नाव माझ्या पाठीमागे आहे. त्यामुळेच रावेर लोकसभेच्या जागेला महत्व आलं आहे. माझ्यावर ही आरोप केले जातोय की मी पक्षांतर करेन. पण मी ठामपणे सांगते की कुटुंबीय म्हणून आम्ही जरी एक असलो तरी एकनाथ खडसे यांचा पक्ष आज बदललेला आहे. माझा पक्ष वेगळा आहे. मी भाजपमध्येच आहे, असं रक्षा खडसे म्हणाल्या.

तुम्ही कोणावरही जबरदस्ती करू शकत नाही. कुणी कुठे काम केलं पाहिजे, याचं महिलांना स्वातंत्र्य आहे. एकनाथ खडसे यांचे विचार सध्या भाजपशी जुळत नाहीत. म्हणून ते वेगळ्या पक्षात आहेत. माझे विचार भाजप पक्षाची जुळतात. त्यामुळे मी भाजपची खासदार आहे, असंही रक्षा खडसे यांनी स्पष्ट केलं.

एखादा पुरुष महिलेच्या पाठीशी उभा राहिला तरच महिला पुढे जाऊ शकते, हे चित्र कुठे ना कुठे बदललं पाहिजे. कुटुंबियांचा सपोर्ट असतो मात्र महिलांचं कर्तुत्व देखील तेवढं असतं. फक्त एकनाथ खडसे नाव मागे आहे. म्हणून माझ्या कामांचा कुठेही विचार केला जात नसेल आणि मला डावलला जात असेल, तर हे अत्यंत चुकीचं आहे, असं रक्षा खडसे यांनी म्हटलं आहे.