जळगाव : भाजपचे नेते, मंत्री गिरीश महाजन यांनी राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्यात मागच्या काही दिवसांपासून शाब्दिक चकमक सुरु आहे. आज गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसे यांच्यावर टीका केली आहे. एकनाथ खडसेंचं डोकं तपासायला लागणार आहे. एकनाथ खडसेंच्या डोक्यावर परिणाम झाला आहे. सतत ईडी मोक्का लावला. हे लावलं, ते लावलं. आपला जावई जेलमध्ये अडकून आहे. ते आधी पाहा… एकनाथ खडसेंना कोर्टाने एवढं ठोकलं की हा माणूस किती चोर आहे हे दाखवून दिलं,असं गिरीश महाजन म्हणालेत.
अजून एक दूध संघाच्या चोरीचं प्रकरण पुढे आला आहे. त्याचे सर्व पुरावे आहेत. आपण किती मोठे चोर आहोत हे लपवण्यासाठी हवेत गोळीबार करायचा. मला जास्त बोलायला लावू नका. मी जर तोंड उघडलं तर लोक तुम्हाला तोंडाला काळ लावतील, असं म्हणत महाजनांनी खडसेंवर टीका केली आहे.
22 आमदार शिंदे गटाला सोडण्याच्या मनस्थितीत आहेत. 9 खासदारही आमच्या संपर्कात आहेत, असं शिवसेना ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी म्हटलं आहे. त्यालाही महाजनांनी उत्तर दिलं आहे.
तुमच्याकडे जेवढे आमदार-खासदार आहेत तेवढे सांभाळा. चार-पाच खासदार तुमच्याकडे आता बाकी आहेत. तेच आता तुमच्याकडे राहायला तयार नाहीत. तेच राहिले तर ते तुमचं नशीब. तुमचे आमदार खासदार आमच्या संपर्कात आहेत. आमच्याकडून तुमच्याकडे कोणी येण्याचा प्रश्नच उरत नाही.उद्धव ठाकरे यांनी त्यांच्याकडील उरलेले आमदार खासदार हे सांभाळले तर पराक्रम केल्यासारखे होईल, असं म्हणत महाजन यांनी विनायक राऊत यांच्या दाव्याला उत्तर दिलं आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीबाबत गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया दिली आहे. लोकसभेच्या निवडणुकीच्या बाबत अजून उमेदवाराची कुठलीही चर्चा झालेली नाही. मात्र या चर्चा बघून मलाही आश्चर्य वाटलं, असं महाजन म्हणालेत.