जालना: ‘राज्यातील महाविकास आघाडी सरकारला 12 महिने पूर्ण झाले तरी यांचे 3 महिने काही संपेना’, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांना टोला लगावला आहे. ‘येत्या दोन ते तीन महिन्यात ठाकरे सरकार पडेल, आपलं सरकार कसं येणार ते लवकरच सांगतोट’, अशी फटकेबाजी रावसाहेब दानवे यांनी परभणीत केली होती. त्याला आमदार रोहित पवार यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. (MLA Rohit Pawar criticizes Union Minister Raosaheb Danve)
औरंगाबाद पदवीधर मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सतिश चव्हाण यांच्या प्रचारासाठी रोहित पवार आज जालन्यात होते. निवडणुकीच्या काळात यांनी भरमसाठ पैसा खर्च केला आणि कोरोनाच्या काळात घरात बसायचं. ही भाजपची विचारसरणी आहे, अशी टीकाही रोहित पवार यांनी केलीय. बारा महिने झाले तरी यांचे तीन महिने संपणार नाहीत. फक्त आपले 105 आमदार कुठे जाऊ नयेत म्हणून भाजपचे नेते असं वक्तव्य करत असल्याचं, रोहित पवार म्हणाले.
येत्या दोन ते तीन महिन्यात ठाकरे सरकार पडेल आणि आपले सरकार येईल. ते कसं येणार आहे, ते पत्रकारांना लवकरच कळवतो, अशी फटकेबाजी भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केली होती.
रावसाहेब दानवे यांनी अनेक वर्षे विधीमंडळात काम केलं. उद्याचं चित्रं सांगण्याचा त्यांचा हा गुण मला माहीत नव्हता. ते ज्योतिषशास्त्राचे जाणकार आहेत हे सुद्धा माहीत नव्हते, असं शरद पवार म्हणाले.
“राज्यातील जनता आज त्रस्त आहे. उद्या महाराष्ट्रातील पाचही जागा भाजप जिंकल्यानंतर महाराष्ट्रातील जनतेला तुमचं सरकार नकोय हे स्पष्ट होईल. तुमच्या एक वर्षाच्या सरकारला जनता त्रस्त झाली आहे, असं म्हणत महाराष्ट्रात सरकार बदलण्याच्या हालचाली होतील” असं मोठं वक्तव्य विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनीही केलं होतं.
राज ठाकरे, पवारांची चौकशी लागली, मग दानवे शुद्ध घीवाले आहेत काय?, बच्चू कडूंचा सवाल
तीन महिन्यात ठाकरे सरकार पडेल, आपलं सरकार कसं येणार ते लवकरच सांगतो : दानवे