नवी दिल्ली : कलम 370 हटवण्यासंदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी राज्यसभेत ऐतिहासिक विधेयक मांडलं. या विधेयकाला शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी जोरदार भाषण करत खंबीर पाठिंबा दिला. “कलम 370 हटवणे म्हणजे एका भस्मासुराचा वध करण्यासारखे आहे. एका सैतानाला मारण्यासारखे आहे. या कलमामुळे आपण 70 वर्षांपासून हा देश, संविधानावर एक डाग घेऊन चालत होतो. तो डाग आज धुवून टाकला गेला, असे जोरदार भाषण करत संजय राऊत यांनी अमित शाहांना पाठिंबा दिला.” संजय राऊत यांच्या भाषणादरम्यान अमित शाहांनी त्यांना पाठिंबा देत अभिमानाने बाक वाजवला.
मोदी सरकारने जम्मू काश्मीरबाबत ऐतिहासिक पाऊल टाकलं. जम्मू काश्मीरला (Jammu Kashmir Article 370) आता केंद्रशासित घोषित करण्यात आलं आहे. इतकंच नाही तर कलम 370 (Article 370) हटवून विशेषाधिकारही काढून टाकण्यात आले आहेत. याशिवाय जम्मू काश्मीरचं विभाजन करुन जम्मू काश्मीर आणि लडाख ही दोन केंद्रशासित राज्यांच्या निर्मितीची घोषणा केली. जम्मू काश्मीरमध्ये विधानसभा अस्तित्वात आहे मात्र लडाखमध्ये विना विधानसभा केंद्रशासित राज्य असेल, असं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राज्यसभेत सांगितलं.
कलम 370 हटवण्याची घोषणा केल्याने ज्या ज्या ठिकाणी भारतीय आहेत ते सर्व आनंदीत झाले आहेत. सगळीकडे उत्साहाचे वातावरण आहे. इतकचं नव्हे तर वीर सावरकर, दीनदयाळ उपाध्याय, श्यामप्रसाद मुखर्जी आणि शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे आपल्यावर स्वर्गातून पुष्पवृष्टी करत असतील, असेही संजय राऊत राज्यसभेत म्हणाले.
“अखंड हिंदुस्थानचं हे आपल्या पूर्वजांचं एक स्वप्न होतं. त्यामुळे 1947 ऐवजी आज जम्मू-कश्मीरचं विलनीकरण झालं आहे. गेल्या 70 वर्षांपासून प्रलंबित असलेला निर्णय आज गृहमंत्र्यांनी घेतला आणि कलम 370 हटवले. या निर्णयाची देश आणि हे सभागृह गेल्या कित्येक वर्षांपासून वाट बघत होते. असेही ते राज्यसभेत म्हणाले.”
कलम 370 हटवल्यानंतर दंगली होतील, जे कलम 370 ला हात लावतील त्यांचे हात जाळू अशा धमक्या दिल्या जात आहेत. पण जर हिंमत असेल तर पेटवून दाखवा आम्ही येथे कशाला बसलो आहोत. गृहमंत्री आणि पंतप्रधान मोदी येथे कशासाठी बसले आहेत.हे जाळून टाकण्याची, धमकवण्याची भाषा आता बंद झाली पाहिजे, असेही संजय राऊतांनी विरोध करणाऱ्यांना खडसावले.
“हे एक मजबूत सरकार आहे. ज्यांनी दाखवून दिले की सरकार कसे काम करते, कशाप्रकारे शासन चालवले जाते. देशाला अखंड राखण्यासाठी जे बलिदान द्यावं लागतं, जी हिम्मत दाखवावी लागते ती हिम्मत आज या सरकारमध्ये पाहायला मिळत आहे. असे सांगत त्यांनी सरकारची पाठराखण केली.”
“तसेच विरोध करणाऱ्यांवर ज्यांनी 70 वर्षांपर्यंत जम्मू-काश्मीरच्या जनतेचं शोषण केलं, पीडित बनवलं, त्यांना अंधारात ठेवलं, भारत देशाच्या मुख्य प्रवाहात येण्यापासून रोखलं. भारत देश हा आपला दुश्मन आहे, असचं शिकवलं. आपले कश्मिरी पंडित असो, किंवा आपले मुस्लिम भाऊ सगळ्यांना वाटत होतं की आपण भारतात सामिल व्हावं, मुख्य प्रवाहात जोडलं जावं पण हे या लोकांनी होऊ दिलं नाही असा टोलाही त्यांनी विरोधकांना लगावला.”
15 ऑगस्ट म्हणजे स्वातंत्र्य दिन, 8 ऑगस्ट म्हणजे क्रांती दिन, आणि आज 5 ऑगस्ट हा क्रांतीच्या महिन्यातील आणखी एक दिवस तुम्ही इतिहासात लिहिला आहे. मी मानतो की हा कठीण होता. मात्र हा निर्णय गृहमंत्र्यांनी मोठ्या धाडसाने घेतला, असेही ते म्हणाले.
“या निर्णयाला विरोध होईल पण आपण पाहिलं असेल की विरोध इथे झोपला आहे. त्यांना झोपू द्या, त्यांना आराम करु द्या. आपण काम करु. आज जम्मू-काश्मीर घेतलं, उद्या बलुचिस्तान घेऊ, त्यानंतर पाकव्याप्त कश्मीर घेऊ आणि अखंड भारताचे जे स्वप्न आहे ते या देशाचे सरकार, पंतप्रधान आणि गृहमंत्री पूर्ण करतील असेही संजय राऊत राज्यसभेत म्हणाले.”
“कलम 370 हटवण्याबाबत जे विधयक मांडण्यात आले, त्याचे मी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, शिवसेना पक्ष, छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमी महाराष्ट्राच्यावतीने स्वागत आणि अभिनंदन करतो. जय हिंद, असे म्हणत त्यांनी आपले भाषण पूर्ण केले.”
कलम 370 हटवणार
मोदी सरकारने मास्टरस्ट्रोक मारत जम्मू काश्मीरमधील कलम 370 (Article 370) हटवण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी जम्मू काश्मीरमधील कलम 370 हटवण्याची शिफारस राज्यसभेत केली. इतकंच नाही तर राज्याच्या पुनर्रचनेचाही प्रस्ताव अमित शाह यांनी मांडला. यानुसार लडाख हे जम्मू काश्मीरपासून वेगळं करण्याचा प्रस्ताव आहे. अमित शाह हे जम्मू काश्मीरला विशेषाधिकार देणारं कलम 35 A रद्द करतील असे तर्क होते, मात्र त्यापुढे जाऊन, ज्या कलमांतर्गत जम्मू काश्मीरला विशेष दर्जा मिळाला आहे, ते कलम 370 हटवण्याचाच प्रस्ताव अमित शाहांनी ठेवला. कलम 370 हटवण्याच्या निर्णयाला राष्ट्रपतींचीही मंजुरी मिळाली.
जम्मू काश्मीरबाबतच्या 5 महत्वाच्या घटना
1) कलम 370 हटवल्याने विशेष अधिकार संपुष्टात
2) जम्मू काश्मीर आणि लडाख या दोन केंद्रशासित राज्यांची निर्मिती
3) भारतीय संविधानातील सर्व तरतुदी जम्मू काश्मीरला लागू
4) जम्मू काश्मीरची वेगळी घटना आणि झेंडा संपुष्टात
5) सर्वांना मालमत्ता खरेदी-विक्रीचा अधिकार
संबंधित बातम्या :
Article 370 | मोदी सरकारने कलम 370 हटवल्यानंतर उद्धव ठाकरे म्हणतात…
Article 370 | राष्ट्रपतींचा तो आदेश, ज्याने कलम 370 हटवलं!
Article 370 | जम्मू काश्मीरमधील कलम 370 हटवल्याने काय होईल?
Article 35 A | जम्मू काश्मीरमधील कलम 35 A हटवल्यास काय होईल?
Jammu Kashmir LIVE : मास्टरस्ट्रोक! जम्मू काश्मीरमधील कलम 370 हटवणार : अमित शाह