मुंबई : अभिनेत्री कंगना रनौत हिने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख केल्याने राज्य सरकारमधील मंत्र्यांपासून सर्वसामान्यांनीही नाराजी व्यक्त केली आहे. विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना कोणी त्यांचा एकेरी उल्लेख केला असता, तर तेही चालवून घेतले नसते, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिली आहे. (Jayant Patil on Devendra Fadnavis Kangana Ranaut issue)
“एखाद्याने प्रसिद्धीसाठी विधानं केली, तर प्रसारमाध्यमांनी दुर्लक्ष करावे, कशाला किती महत्त्व द्यायचे? याला काही मर्यादा आहेत. राज्यातील प्रमुखांबाबत अशी भाषा वापरणे हे जनतेला मान्य आणि सहन होणार नाही” असे मत जयंत पाटील यांनी व्यक्त केले. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते, त्यांचा कोणी एकेरी उल्लेख केला असता, तर तेही मान्य केलं नसतं, असे जयंत पाटील म्हणाले.
कंगनाच्या कार्यालयावर केलेल्या कारवाईला बीएमसी उत्तर देईल. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी या प्रकरणावरुन नाराज आहेत, हे तुम्ही सांगितल्यावर समजलं. माझ्या माहितीत असं आलेलं नाही, असेही ते म्हणाले.
कंगनाच्या मुद्द्यावर महाराष्ट्राच्या बाजूने बोलण्याची अपेक्षा आहे, मात्र भाजप नेते ती पूर्ण करत नाहीत. कोण कुणाला समर्थन देत आहे मुद्दामहून, हे महाराष्ट्राच्या लक्षात येत आहे. कंगनाचा बोलविता आणि करविता धनी कोण आहे, हे दिसत आहे. तिच्या मागे कोणता पक्ष आहे, हे आता स्पष्ट झालं आहे, अशी टीकाही जयंत पाटील यांनी केली.
पहा व्हिडीओ :
“विषय महाराष्ट्राचा प्रतिक्रिया हिंदीत ? महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते बोलत आहेत की भाजपचे बिहार निवडणुक प्रभारी हे महाराष्ट्रातील जनतेला कळायला हवं ?” अशा शब्दात जयंत पाटील यांनी कालच कंगनाच्या मुद्द्यावर हिंदीत प्रतिक्रिया देणाऱ्या फडणवीसांना टोला लगावला होता. (Jayant Patil on Devendra Fadnavis Kangana Ranaut issue)
विषय महाराष्ट्राचा प्रतिक्रिया हिंदीत ?
महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते बोलत आहेत की भाजपचे बिहार निवडणुक प्रभारी हे महाराष्ट्रातील जनतेला कळायला हवं ?#JustAsking@Dev_Fadnavis https://t.co/uu9WB6aLuV
— Jayant Patil (@Jayant_R_Patil) September 9, 2020
“उद्धव ठाकरे तुला काय वाटतं? फिल्म माफियासोबत माझं घरं तोडून फार मोठा सूड उगवला. आज माझं घर मोडलं आहे, उद्या तुझा अहंकार मोडेल.” अशी एकेरी भाषा कंगनाने वापरली होती.
संबंधित बातम्या :
अनिलभैयांना श्रद्धांजली वाहताना उद्धव ठाकरेंचा कंगनाला अप्रत्यक्ष टोला
कंगना प्रकरणात राज्यपालांची उडी, अजॉय मेहतांमार्फत मुख्यमंत्र्यांकडे नाराजी व्यक्त
“हा माझा सर्वात आवडता फोटो, यात माझ्या आयुष्याला मिळालेली कलाटणी”, कंगना रनौतचं नवं ट्वीट
(Jayant Patil on Devendra Fadnavis Kangana Ranaut issue)