पंकजांच्या राष्ट्रवादी प्रवेशाची चर्चा ते धनंजय मुंडेप्रकरणावर भाष्य, जयंत पाटील यांचे 3 मोठे मुद्दे

| Updated on: Jan 14, 2021 | 12:43 PM

जयंत पाटील यांनी विरोधी पक्षांकडून महाविकासआघाडीच्या नेत्यांवर करण्यात येणाऱ्या आरोपांसदर्भात मौन सोडले. | Jayant Patil

पंकजांच्या राष्ट्रवादी प्रवेशाची चर्चा ते धनंजय मुंडेप्रकरणावर भाष्य, जयंत पाटील यांचे 3 मोठे मुद्दे
भाजपला निराशेने ग्रासले आहे. शिवसेनेशिवाय दुसरा पर्याय त्यांना दिसत नाही.
Follow us on

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी गुरुवारी मुंबईत घेतलेल्या पत्रकारपरिषदेची सध्या राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे. यावेळी जयंत पाटील यांनी अनेक महत्त्वाचे खुलासे केले. यावेळी त्यांनी विरोधी पक्षांकडून महाविकासआघाडीच्या नेत्यांवर करण्यात येणाऱ्या आरोपांसदर्भात मौन सोडले. त्यांनी महाविकासआघाडीच्या नेत्यांची पाठराखण केली. राज्य सरकार कोणत्याही चौकशीत हस्तक्षेप करणार नाही, असेही जयंत पाटील यांनी सांगितले. (Jayant Patil press conference in Mumbai)

दरम्यान, या पत्रकारपरिषदेत जयंत पाटील यांनी काही मुद्द्यांवर सूचक भाष्य केले. त्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगायला सुरुवात झाली आहे.

जयंत पाटील यांच्या पत्रकारपरिषदेतील तीन महत्त्वाचे मुद्दे खालीलप्रमाणे:

1. या पत्रकारपरिषदेत जयंत पाटील यांना पंकजा मुंडे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाविषयी विचारणा करण्यात आली. त्यावर जयंत पाटील यांनी फार बोलणे टाळले. माझ्यापर्यंत अद्याप तशी कोणतीही चर्चा आलेली नाही, एवढेच त्यांनी म्हटले.

2. धनंजय मुंडे प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आता पुढील तपास करत आहेत. त्यामुळे सध्या मी या प्रकरणावर काहीच बोलणार नाही. मात्र, माझा धनंजय मुंडे यांच्यावर विश्वास असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले.

संबंधित महिलेने त्यांच्यावर आरोप केले, पोलिसांनी त्याची तक्रारही दाखल करुन घेतली. त्यामुळे आता पोलीस तपास करुन पुढील कारवाईचा निर्णय घेतील, असे जयंत पाटील यांनी म्हटले. मात्र, धनंजय मुंडे यांनी न्यायालयात पूर्वीच ब्लॅकमेलिंगची केस दाखल केली आहे, याकडेही जयंत पाटील यांनी लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.

3. या पत्रकारपरिषदेत जयंत पाटील यांनी नवाब मलिक यांच्या जावयावर एनसीबीकडून करण्यात आलेल्या कारवाईविषयी भाष्य करण्यात आले. नवाब मलिक यांच्या जावयाने गुन्हा केला असेल तर त्याची चौकशी केली जाईल. यामध्ये राज्य सरकारकडून कोणताही हस्तक्षेप केला जाणार नाही. मात्र, जावयाच्या गुन्ह्यासाठी सासऱ्याला जबाबदार धरणे योग्य नाही, असे जयंत पाटील यांनी म्हटले.

संबंधित बातम्या:

जयंत पाटील यांचे एकाच दगडात दोन पक्षी, धनंजय मुंडे आणि मेहबूब शेख प्रकरणावर प्रतिक्रिया

राजकारण्यांनी भान ठेवावं, धनंजय मुंडे प्रकरणात संजय राऊतांचं भाष्य

ना पोलीस, ना सुरक्षारक्षकांचा ताफा, धनंजय मुंडे भल्या पहाटे एकटेच चित्रकूट बंगल्यावर

(Jayant Patil press conference in Mumbai)