“ठाकरेंकडून सत्ता-धनुष्यबाण हिसकावून घेतलं, महाराष्ट्राच्या जनतेला पसंत नाही, उत्तर मिळणारच!”

| Updated on: Oct 14, 2022 | 3:45 PM

जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे...

ठाकरेंकडून सत्ता-धनुष्यबाण हिसकावून घेतलं, महाराष्ट्राच्या जनतेला पसंत नाही, उत्तर मिळणारच!
Follow us on

रवी गोरे, प्रतिनिधी, जळगाव : राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर टीका केली आहे. धनुष्यबाण चिन्ह गोठल्याच्या मुद्द्यावरून त्यांनी एकनाथ शिंदेंवर टीका केलीय. एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडून सत्ता हिसकावून घेतली. उद्धव ठाकरे यांच्याकडून धनुष्यबाण हिसकावून घेतलं. महाराष्ट्राच्या जनतेला हे पसंत पडलेलं नाही, असं जयंत पाटील (Jayant Patil) म्हणालेत.

शिंदेंनी जरी धनुष्यबाणावर दावा केला. चिन्ह गोठवण्यात आलं. तरी उद्धव ठाकरे यांना मशाल हे चिन्ह मिळालं आणि ते लोकप्रिय झालं. आता शिंदेंनी पुढचं पाऊल टाकलं. मशाल बदलण्याचा प्रयत्न केला. तरी पुढे मिळणारं जे चिन्ह असेल तेही तितकंच लोकप्रिय होईल, असं जयंत पाटील म्हणालेत.

उद्धव बाळासाहेब ठाकरे या नावाला महाराष्ट्रात महत्त्व आहे. चिन्हापेक्षा लोकभावनेला जास्त महत्त्व आहे, असं जयंत पाटील म्हणाले आहेत.

जे आमदार उद्धव ठाकरे यांची फसवणूक करून जे आमदार गेले आहेत. त्यांच्याविरोधात जनमत महाराष्ट्रात फार मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे या सरकारच्या विरोधात सर्व महाराष्ट्रातील जनता आहे. महाराष्ट्राच्या जनतेला हे पसंत पडलेलं नाही, असं पाटील म्हणालेत.

शिंदे सरकार हे नवीन सरकार आलं तेव्हापासून विरोधकांना कमजोर करण्याचं काम केलं जात आहे. ज्या पायावर हे सरकार उभे राहिला आहे, त्याला कोणतं नैतिक अधिष्ठान नाही, असंही जयंत पाटील म्हणालेत.

रमेश लटकेंच्या निधनामुळे विधानसभेची जागा रिक्त झाली.  त्या अंधेरीच्या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणजेच ऋतुजा लटके याच शंभर टक्के निवडून येणार, असा विश्वासही जयंत पाटलांनी व्यक्त केलाय.