मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात एका रात्रीत भूकंप (Ajit Pawar removed as NCP legislative party leader) झाला. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. यानंतर आता अजित पवारांची विधीमंडळ गटनेतेपदावरुन हकालपट्टी करण्यात आली (Ajit Pawar removed as NCP legislative party leader) आहे. यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांची विधीमंडळ नेतेपदी नियुक्ती करण्यात आली (Ajit Pawar removed as NCP legislative party leader) आहे.
नुकंतच राष्ट्रवादी काँग्रेसची यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत अजित पवार यांची विधीमंडळ नेते पदाची निवड रद्दबातल करतानाच सर्व अधिकार काढण्याचा ठराव घेण्यात आला. तसेच पक्षाचे निर्णय घेण्याचे सर्व अधिकार राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना देण्याचा ठरावही या बैठकीत घेण्यात आला.
राष्ट्रवादीने अजित पवारांची 30 ऑक्टोबर 2019 रोजी विधीमंडळ पक्षनेते पदी निवड करण्यात आली होती. मात्र त्यांनी भाजपसोबत जाण्याची भूमिका घेतली. ते पक्षाच्या ध्येय धोरणांशी सुसंगत नाही. यामुळे अजित पवार यांच्याकडे असलेले व्हिप बजावण्याचे अधिकार रद्द करण्यात आले (Ajit Pawar removed as NCP legislative party leader) आहे.
अजित पवारांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर याचे तीव्र पडसाद राज्यभरात उमटत आहेत. ठिकठिकाणी अजित पवार यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात येत आहेत.
अजित पवारांच्या बंडानंतर राष्ट्रवादीच्या बैठकीला जितेंद्र आव्हाड, सुप्रिया सुळे, धनंजय मुंडे यांसह इतर नेते उपस्थित होते. राष्ट्रवादीच्या बैठकीला 54 आमदारांपैकी 42 आमदारांची उपस्थितीत होते. तर अजित पवारांसोबत गेलेल्या 11 आमदारांपैकी 8 आमदारही बैठकीला हजर होते. यशवंतराव चव्हाण सेंटरवर ही बैठक पार पडली.
दरम्यान या बैठकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी अजित पवारांना फोन करुन त्यांची मनधरणी केली. या दोघांमध्ये जवळपास 10 मिनिटे चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहेत. इतकंच नव्हे तर, अजित पवारांशी चर्चा करण्यासाठी सुनिल तटकरे, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ हे सर्व अजित पवारांचे बंधू श्रीनिवास पवार यांच्या घरी (Ajit Pawar removed as NCP legislative party leader) दाखल झाले आहेत.
तर दुसरीकडे अजित पवारांसोबत राजभवनावर गेलेले सात आमदार पुन्हा राष्ट्रवादीत परतले. हे सर्व आमदार शरद पवारांसोबत राष्ट्रवादीच्या बैठकीला हजर होते. यात सुनिल शेळके, माणिकराव कोकाटे, दिलीप बनकर, सुनिल भूसारा यासह इतर आमदार शरद पवारांसोबत बैठकीला हजर असल्याची माहिती समोर येत आहे.