मुंबई : राष्ट्रवादीने (NCP) पुणे पदवीधर मतदारसंघात (Graduate Constituency Election 2020) अरुण अण्णा लाड (Arun Anna Lad) तर औरंगाबादमधून सतीश चव्हाण (Satish Chavan) यांना उमेदवारी दिली आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी या जागांवरच्या उमेदवारांची घोषणा करतावेळीच लाड आणि चव्हाण यांच्या विजयाची खात्री व्यक्त केली. (jayant patil tweet on Arun Lad And Satish Chavan over Graduate Constituency Election 2020)
“विधानपरिषद निवडणुकीत पदवीधर मतदारसंघातून औरंगाबाद विभागात राष्ट्रवादीचे सतीश चव्हाण तर पुणे विभागातून राष्ट्रवादीचेअरुण लाड यांना महाविकास आघाडीतर्फे उमेदवार म्हणून घोषित करण्यात येत आहे. दोन्ही उमेदवार या निवडणुकीत विजयी होतील”, असा विश्वास पक्षाच्यावतीने जयंत पाटील यांनी व्यक्त केला आहे.
विधानपरिषद निवडणुकीत पदवीधर मतदारसंघातून औरंगाबाद विभागात राष्ट्रवादीचे श्री. सतीश चव्हाण तर पुणे विभागातून राष्ट्रवादीचे श्री. अरुण लाड यांना महाविकास आघाडीतर्फे उमेदवार म्हणून घोषित करण्यात येत आहे. दोन्ही उमेदवार या निवडणूकीत विजयी होतील, याचा आम्हाला विश्वास आहे.
— Jayant Patil (@Jayant_R_Patil) November 12, 2020
महाविकास आघाडीने जो आमच्यावर विश्वास दाखवला आहे, त्या विश्वासाला पात्र राहून येणाऱ्या काळात पदवीधरांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी आम्ही कटिबद्ध राहू, असा निर्धार अरुण लाड आणि सतिश चव्हाण यांनी बोलून दाखवला आहे.
कोण आहेत अरुण अण्णा लाड
पुणे विधानपरिषदेच्या पदवीधर मतदारसंघातून राष्ट्रवादीचे नेते अरुण अण्णा लाड यांना राष्ट्रवादीकडून उमेदवारी जाहीर झाली आहे. अरुण अण्णा लाड हे क्रांती साखर कारखान्याचे चेअरमन आहेत. तसेच स्वातंत्र्य सैनिक, क्रांतीअग्रनी स्वर्गीय जी. डी. बापू लाड यांचे पुत्र आहेत.
कोण आहेत सतिश चव्हाण
मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचंच ते प्रतिनिधित्व करतात. शैक्षणिक प्रश्नांवर सतिश चव्हाण यांचं चांगलं काम आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अतिशय निकटवर्तीय म्हणून सतिश चव्हाण यांची ओळख आहेत.
पुणे पदवीधर मतदारसंघ
राष्ट्रवादीकडून अरुण लाड 9Arun Lad) यांची उमेदवारी जाहीर झाल्यावर राष्ट्रवादी समर्थक प्रताप माने (Pratap Mane) यांनीही पुणे पदवीधर मतदारसंघात आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर पुणे पदवीधर मतदारसंघात भाजपाकडून (BJP) संग्रामसिंह देशमुख (Sangram Deshmukh) आणि मनसेकडून रुपाली पाटील (Rupali Patil) निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यामुळे ही निवडणूक अटीतटीची होणार आहे.
औरंगाबाद पदवीधर मतदारसंघ
राष्ट्रवादीने औरंगाबादमधून सतीश चव्हाण यांना उमेदवारी दिली आहे. औरंगाबादेत भाजपमध्ये जोरदार बंडखोरी होताना दिसत आहे. पंकजा मुंडे समर्थक प्रवीण घुगे (Pravin Ghuge) आणि बीडचे माजी जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे (Ramesh Pokle) यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यामुळे पदवीधर निवडणुकीत भाजपला मोठा धक्का मानला जात आहे.
पदवीधर निवडणूक : भाजपात डबल बंडखोरी, पंकजा मुंडेंच्या समर्थकाचा उमेदवारी अर्ज, माजी जिल्हाध्यक्षाचाही बंडाचा झेंडा https://t.co/oVb3tu9zzY @BJP4Maharashtra #Aurangabad @Pankajamunde
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 11, 2020
संबंधित बातम्या