मुंबई – एसटीच्या कर्मचाऱ्यांनी अचानक शरद पवार (Sharad Pawar) यांच्या घरावरती हल्ला केल्यानंतर कामगाराचे वकील गुणरत्न सदावर्ते (Gunratn Sadavarte) यांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले. पोलिस चौकशी करीत असताना गुणरत्न सदावर्ते यांनी एक लाख कामगारांकडून साधारण दोन कोटी रूपये घेतल्याचे उघडकीस आले आहे. त्यातील 80 लाख रूपये जयश्री पाटील (Jayashree Patil) यांच्याकडे आहेत असे सरकारी वकील प्रदीप घरत यांनी सांगितले. त्याआधारे पोलिसांनी जयश्री पाटील यांच्यावरती गुन्हा दाखल केला आहे. अनेक दिवसांपासून त्या गायब होत्या. पोलिस त्यांचा शोध घेत होते. आज जयश्री पाटील यांनी अटकपूर्व जामीनासाठी अर्ज मुंबई सत्र न्यायालयात धाव घेतल्याची माहिती मिळत आहे.
गच्चीवर झालेल्या बैठकीत त्या दिसल्या होत्या
जयश्री पाटील यांच्या विरोधात गावदेवी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शरद पवार यांच्या घरावर हल्ला होण्यापुर्वी वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या घराच्या गच्चीवरती एक बैठक झाली होती. विशेष म्हणजे त्या बैठकीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल सुध्दा झाला होता. त्या बैठकीत जयश्री पाटील सुध्दा दिसल्या होत्या. ज्यावेळी एसटी कामगारांकडून पैसे घेण्यात आले त्यावेळी त्यांना कसल्याही प्रकारची पावती देण्यात आलेली नाही. त्याचा साधा हिशोब सुध्दा दिलेला नाही असे रिमांड कॉपीत असल्याचे सरकारी वकीलांनी सांगितली आहे.
दोन कोट रूपयांचं केलं काय ?
त्यामुळे या रिमांड कॉपीनुसार जयश्री पाटील सध्या पोलिसांसाठी आरोपी आहे. मागच्या काही दिवसांपासून त्या कुठे आहेत पोलिसांना सापडत नव्हत्या. पोलिसांनी त्यांना शोधण्यासाठी पथक सुध्दा तयार केले आहे. हे पथक सध्या त्यांचा शोध घेत आहे. पोलिसांना त्या सापडल्या नाही तर न्यायालयात त्यांना फरार घोषित करू शकतात. त्यानंतर त्यांच्याविरोधात लूक आऊट नोटीस जारी करण्यात येईल. पोलिसांच्या तपासात त्यांनी कामगारांकडून 2 कोटी जमा केले आहेत. यामुळे कदाचित न्यायालय या काळात त्यांनी कोणती मालमत्ता खरेदी केली आहे काय ? ते याच पैशातून केली आहे का ? हे तपासले जाईल त्याकरता ती मालमत्ता जप्तही केली जाऊ शकते असे कायदेतज्ज्ञ म्हणत होते.