फडणवीसांच्या ट्विटर वॉरला जितेंद्र आव्हाडचं प्रत्युत्तर; म्हणाले, मग स्त्रियांना 50 टक्के वाटा कसा मिळाला

| Updated on: Apr 14, 2022 | 5:44 PM

ठाणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आपल्या दोन्ही सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर टीका केली होती. तसेच त्यांनी आपल्या भाषणात शरद पवार हे नास्तिक आहेत, ते क्वचितच एखाद्या मंदिरात दिसतील असं वक्तव्य केलं होतं. इतकंच नाही तर शरद पवार यांनीच राज्यात जातीवादाचं विष पसरवल्याचा गंभीर आरोपही […]

फडणवीसांच्या ट्विटर वॉरला जितेंद्र आव्हाडचं प्रत्युत्तर; म्हणाले, मग स्त्रियांना 50 टक्के वाटा कसा मिळाला
जितेंद्र आव्हाड
Image Credit source: TV9
Follow us on

ठाणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आपल्या दोन्ही सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर टीका केली होती. तसेच त्यांनी आपल्या भाषणात शरद पवार हे नास्तिक आहेत, ते क्वचितच एखाद्या मंदिरात दिसतील असं वक्तव्य केलं होतं. इतकंच नाही तर शरद पवार यांनीच राज्यात जातीवादाचं विष पसरवल्याचा गंभीर आरोपही राज यांनी केला होता. यावर आता राज्यात जोरदार रणकंदन माजले होते. त्यानंतर राज ठाकरे यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना, पवार यांनी जोरदार प्रत्युत्तर देत प्रबोधनकार ठाकरेच आपले आदर्श असल्याचा टोला लगावला होता. दरम्यान मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा हा वाद सुरू असतानाच यात भाजपनं उडी घेत शरद पवार यांच्यावर हल्लाचढवला आहे. यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी एकापाठोपाठ एक 14 ट्वीट करत शरद पवार यांच्यावर प्रश्नांची सरबत्तीच केली. त्यावर आता महाविकासआघाडी सरकारमधील मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी प्रत्युत्तर दिले आहे. आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा चांगलाच समाचार घेतला. तसेच त्यांनी, ‘हिंदू दहशतवाद’ शब्द पहिल्यांदा कुणी वापरला? याचे उत्तर दिले आहे.

तर स्त्रियांना 50 टक्के वाटा कसा

राज ठाकरे यांच्या टीकेनंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी एकापाठोपाठ एक असे 14 ट्वीट करत शरद पवार यांच्यावर प्रश्नांची झोड उडविली. त्यावर जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी प्रत्युत्तर दिले आहे. आव्हाड यांनी, जर 370 ला बाबासाहेबांचा विरोध होता तर ते कॉन्स्टिट्यूशन मध्ये आलं कसं? हे मला काही समजलं नाही असे म्हटलं आहे. तसेच जर हिंदू कोड बिलचा विरोध झाला असेल तर ते स्त्रियांना 50 टक्के वाटा कसा मिळाला. त्यावेळचा जर सामाजिक राजकीय वातावरणाचा अभ्यास केला तर, पुरुष प्रधान संस्कृती ला महत्त्व दिलं जायचं हे समोर येईल. त्यामुळे स्त्रियांना 50 टक्के वाटा द्यावा असं त्यावेळच्या राजकीय नेत्यांना योग्य वाटलं नव्हतं. पण ते योग्य आहे बाबासाहेबांना

वाटतं होतं, असं म्हटलं आहे.

तर काश्मीर फाईल्सच्या ट्वीटवरून बोलताना आव्हाड म्हणाले, कश्मीर फाईव्ह पेक्षा तुमचा कश्मीरीच्या विकासामध्ये कश्मीरी पंडित यांच्या विकासामध्ये योगदान किती हे बोला ना? हे पिक्चर दाखवून काय होणार आहे. मुंबई बॉम्बस्फोटानंतर 13 वा बॉम्बस्फोट हा मुस्लिम वस्तीत झाल्याचे मला माहीत नाही. 93 ची आठवण तुम्ही काढू नका. कशाला 93 च्या आठवण काढता, असा प्रतिसवाल त्यांनी उपस्थित केला आहे. त्याचबरोबर नथुराम गोडसेंनी गांधींची हत्या केली. कोणी पेढे वाटले? कोणी गुलाल उधळला? संविधान कोणी नाकारलं? तिरंग्यामध्ये तीन रंगा येतात हे वाईट आहे का? us 2022-2023 सुरू आहे. यावेळी उगाच इतिहास खणून त्याच्यातली राहिलेल्या हाडं बाहेर काढणं हे माझ्या दृष्टीने सर्व चुकीचं आहे. काही विषय तिथल्यातिथे बंद करायचे असतात असेही आव्हाड म्हणाले.

तसेच शरत जहाँ ही निर्दोष होती, याबाबत पवारांनी केलेल्या विधानाचेही स्मरण करणारे ट्विट फडणवीस यांनी केले होते. त्यावर, इशरत जहाँ बाबत असं कधीही कोणीही म्हटलेलं नाही. ते कुठलाही आरोप करतील. त्यांना आरोप करायला काय जातंय? ते काही विचारतील त्यांच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर दिलेचं पाहिजे असं थोडी आहे का? असंही आव्हाड म्हणाले. तर जेम्स लेनच्या वाद पुन्हा घालायची इच्छा नसल्याचे सांगत, जेव्हा खरा वाद घालायचा होता तेव्हा तुम्ही घरात बसला होता असा टोला त्यांनी फडणवीस यांना मारला आहे. तर जेम्स लेनचे पुस्तक महाराष्ट्राच्या बाजारात पहिल्यांदा आपल्या काही मित्रांनी आणल्याचेही त्यांनी म्हटलं आहे. त्यातील प्रमुख माणूस होता किशोर ढमाले. त्यामुळे या विषयांमध्ये हात घालायचा नाही.

राज ठाकरे

राज ठाकरे यांच्याविषयी बोलताना, राज ठाकरे यांनी पवार आणि माझ्यावरती वैयक्तिक टीका केली म्हणून मी बोललो. नाहीतर मी यापूर्वी कधीही राज ठाकरे यांच्या वरती बोललो नसल्याचे आव्हाड यांनी सांगितलं आहे. त्याचबरोबर लोकांना जे आवडतं ते राज बोलतात. त्यांनी मला बोलले मी त्यांना बोललो असे आव्हाड यांनी म्हटले आहे. तसेच आता राज ठाकरे यांचा विषय संपला असल्याचेही आव्हाड यांनी म्हटले आहे. तर आम्हाला अडचणीत आणून दोघांमध्ये कुठेतरी भांडण लावायचे काम माध्यमांनी करू नये असेही आव्हाड यांनी म्हटले आहे.

इतर बातम्या : 

Pune accident : वारजे पुलावर विचित्र अपघात, एकाच कुटुंबातले चौघे गंभीर

Ambedkar Jayanti 2022: तब्बल 70 फुट ऊंच मूर्ती उभारत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना लातूरकरांची अनोखी मानवंदना

Dr. Babasaheb Ambedkar Jayanti : डॉ. आंबेडकरांनी दिलेले संविधान संपविण्याचा केंद्रातील सत्ताधाऱ्यांचा डाव, नाना पटोलेंचा गंभीर आरोप