मुंबई : राष्ट्रवादीचे (NCP) नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी पुन्हा एकदा ओबीसी आरक्षणावरून भाजपावर निशाणा साधला आहे. केंद्र सरकारने ओबीसींची (OBC) जनगणना करावी अशी मागणी त्यांनी केली आहे. केंद्र सरकारने ओबीसींची जनगणना करावी, जे काय असेल ते समोर येईल. मात्र सध्या जे सत्तेत आहेत त्यांच्याकडून ओबीसींचं कल्याण होईल असे वाटत नसल्याचे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे. ओबीसी आरक्षणाबाबत केंद्रांची दुटप्पी भूमिका दिसून येत आहे. कोर्टात एक सांगायचं लोकसभेत एक सांगायचं असे केंद्राचे धोरण असल्याची टीका देखील जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. ओबीसींची नक्की लोकसंख्या किती हा प्रश्न निर्माण होतो, त्यामुळे जनगणना होणे गरजेचे असल्याचे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे. यावेळी त्यांनी आरएसएसचे भैय्याजी जोशी यांच्यावर देखील निशाणा साधला आहे. भय्याजी जोशी म्हणतात अशी जनगणना योग्या नाही, यातूनच त्यांची मानसिकता दिसून येत असल्याचे आव्हाड यांनी म्हटले आहे.
पुढे बोलताना जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले की, ओबीसी आरक्षणाबाबत केंद्राची दुपट्टी भूमिका आहे. ते न्यायालयात एक माहिती देतात, मात्र लोकसभेत दुसरेच सांगतात. ओबीसीच्या आरक्षणासाठी महाविकास आघाडी सरकार जबाबदार आहे, असे आरोप भाजपाकडून करण्यात येतात. मात्र तसे म्हणण्याचा भाजपाला कोणताच नैतिक अधिकार नाही. कारण भाजपाला अंतकरणापासून ओबीसी वर्ग पुढे जावा असे वाटत नसल्याची टीका देखील त्यांनी यावेळी केली आहे. केंद्र सरकारचा स्टॅंडिंग कमिटीचा रिपोर्ट आहे, त्यात त्यांनी सांगितलं की इम्पेरिकल डेटा 98 टक्के अचून आहे, मात्र तरीही केंद्राने आपली दुटप्पी भूमिका कायम ठेवल्याचे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे.
दरम्यान यावेळी जितेंद्र आव्हाडांनी भैय्याजी जोशींवर देखील ओबीसी आरक्षणावरून टीका केली आहे. भय्याजी जोशी हे संघाचे आहेत. ते म्हणतात की अशी जनगणना योग्य नाही, यातूनच त्यांची मानसिकता दिसून येत असल्याचे आव्हाड यांनी म्हटले आहे. केंद्र सरकारने ओबीसीची जनगणना करावी त्यातून जे काय आहे ते समोर येईल. मात्र आता जे सत्तेत आहेत, ते ओबीसींचं कल्याण करतील असे वाटत नसल्याचे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे.