मुंबई : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Bhagat singh Koshyari) यांनी औरंगाबादमध्ये एका कार्यक्रमात बोलताना छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्याबाबत वादग्रस्त विधान केलं. त्यानंतर राजकीय वातावरण तापलंय. त्यावर राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी आक्रमक प्रतिक्रिया दिली आहे. “हे ‘भाज्यपाल’ मराठी माणसाच्या राशीला नकोत!”, असं म्हणत आव्हाडांनी कोश्यारी यांच्या विधानाचा निषेध केलाय.
“थोड्या दिवसांपूर्वी स्वतः रस्त्यावर उतरून आंदोलन केलं होत की हे भाज्यपाल मराठी माणसाच्या राशीला नकोत! महात्मा फुले,छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल वाईट बोलले गेले. पुन्हा एकदा संपूर्ण देशाचे आदर्श आहेत अशा महाराजांबद्दल त्यांना जुने आदर्श म्हणून हिणवले. बस झाले आता बोचंक गुंडाळ!”, असं ट्विट आव्हाडांनी केलं आहे.
थोड्या दिवसांपूर्वी स्वतः रस्त्यावर उतरून आंदोलन केलं होत की हे भाज्यपाल मराठी माणसाच्या राशीला नकोत
महात्मा फुले,छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल वाईट बोलले गेले
पुन्हा एकदा संपूर्ण देशाचे आदर्श आहेत अशा महाराजांबद्दल त्यांना जुने आदर्श म्हणून हिणवले
बस झाले आता बोचंक गुंडाळ pic.twitter.com/u6Xu1SFwKr— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) November 19, 2022
तुम्हा तरूण मुलांना जर कुणी विचारलं तुमचा आयकॉन कोण? तुमचा आवडता नेता कोण? तर तुम्हाला बाहेर जायची गरज नाही. महाराष्ट्रातच तुम्हाला भेटून जातील. शिवाजी महाराज तर जुन्या काळातील आहेत. मी आधुनिक काळाबाबत बोलत आहे. इथेच मिळतील. डॉ. आंबेडकरांपासून ते डॉ. नितीन गडकरींपर्यंत तुम्हाला सर्व इथेच मिळतील, असं वादग्रस्त वक्तव्य भगतसिंह कोश्यारी यांनी केलं.
हर हर महादेव चित्रपटात चुकीचा इतिहास दाखवल्याचा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी काही दिवसाआधी केला होता. त्यानंतर झालेल्या राड्याप्रकरणी आव्हाडांवर गुन्हाही दाखल झाला होता. त्यानंतर आता कोश्यारी यांच्या वादग्रस्त विधानावर आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा पदवीदान समारोह काल पार पडला. यात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि भाजप नेते, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी डी.लिट पदवी प्रदान करण्याच आली. यावेळी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी देखील उपस्थित होते. यावेळी बोलताना कोश्यारी यांनी शिवरायांबद्दल हे वादग्रस्त वक्तव्य केलंय.