मुंबई : एकनाथ शिंदे गटाचे प्रवक्ते आमदार दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप केलाय. आजपर्यंत शिवसेना जेव्हा जेव्हा फुटली, त्या प्रत्येक फुटीमागे शरद पवार (Sharad Pawar) यांचा हात आहे, ही वस्तुस्थिती आहे, असा आरोप केसरकर यांनी पवारांवर केलाय. केसरकर यांनी पवारांवर केलेल्या टीकेला आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय. ‘अहो केसरकर किती बोलता पवार साहबां विरुद्ध एके काळी साहेबांनी अनेकांना नाराज करत तुम्हाला सिंधुदुर्ग आणि गोव्यात हाताला धरून फिरवले. ज्या ताटात जेवलात त्यातच थुंकायचे हे कुठून शिकलात? असा खोचक सवाल आव्हाड यांनी केसरकरांना केलाय.
जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटरवरुन केसरकरांवर निशाणा साधलाय. ‘अहो केसरकर किती बोलता पवार साहबां विरुद्ध एके काळी साहेबांनी अनेकांना नाराज करत तुम्हाला सिंधुदुर्ग आणि गोव्यात हाताला धरून फिरवले. ज्या ताटात जेवलात त्यातच थुंकायचे हे कुठून शिकलात
2014 ला मीच आलो होतो साहेबांचा निरोप घेऊन. जिथे आहात तिथे सुखी राहा. खाजवून खरूज काढू नका’ असा सूचक इशाराच आव्हाड यांनी केसरकरांना दिलाय.
अहो केसरकर किती बोलता पवार साहबां विरुद्ध एके काळी साहेबांनी अनेकांना नाराज करत तुम्हाला सिंधुदुर्ग आणि गोव्यात हाताला धरून फिरवले
ज्या ताटात जेवलात त्यातच थुंकायचे हे कुठून शिकलात
2014 ला मीच आलो होतो साहेबांचा निरोप घेऊन
जिथे आहात तिथे सुखी राहा
खाजवून खरूज काढू नका— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) July 13, 2022
दीपक केसरकर यांनी शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली होती. आजपर्यंत राज्यात शिवसेना जेव्हा जेव्हा फुटली, त्या प्रत्येक फुटीमागे शरद पवार यांचा हात आहे. ही वस्तुस्थिती आहे. तेव्हा शरद पवार यांनी शिवसेना का फोडली? बाळासाहेब ठाकरे जिवंत असताना त्यांना यातना का दिल्या? याचं उत्तर शरद पवार यांनी महाराष्ट्रातील जनतेला द्यावं, असं आव्हानच केसरकर यांनी पवारांना दिलं होतं.
एकनाथ शिंदेंचा गट शिवसेनेतून बाहेर पडला तरीही शिवसेना आणि उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरेंप्रति आमची निष्ठा असल्याचं शिंदे गटाकडून वारंवार सांगण्यात आलं आहे. शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकरांनीही नुकतीच यावर प्रतिक्रिया दिली. तसेच भाजप नेते निलेश राणे, नितेश राणे यांच्या सुपुत्रांनीही ठाकरे घराण्यावर सुरु असलेली टीका आता बंद करावीत. देवेंद्र फडणवीसांना सांगून आम्ही ही टीका बंद करू असं वक्तव्य केसरकरांनी केलं होतं. मात्र दीपक केसरकरांनाच निलेश राणे यांनी पुन्हा एकदा सुनावलं आहे. दीपक केसरकर 25 दिवसांपूर्वी तुम्ही किती लहान होतात हे विसरू नका…असा इशारा त्यांनी दिलाय. त्यामुळे राणे पुत्रांमुळे शिंदे गट आणि भाजपमध्ये खडाजंगी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दीपक केसरकर लिमिटमध्ये राहा. pic.twitter.com/LARj8cVLoO
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) July 13, 2022