मुंबई : शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेस नेते जितेंद्र आव्हाड यांनी संताप व्यक्त केला आहे. जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर व्हिडीओ पोस्ट करत विरोध दर्शवला आहे. याआधीही महाराष्ट्र भूषण पुरस्कार पुरंदरेंना देताना आव्हाड यांनी विरोध केला होता.
बाबासाहेब पुरंदरेंना पद्मविभूषण पुरस्कार जाहीर करुन शिवप्रेमींच्या भळभळून वाहणाऱ्या जखमेवर मीठ चोळले असल्याचं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे. पुढे त्यांनी शिवविचारांनी महाराष्ट्र पेटवणार अशी धमकीच दिली आहे. ट्विटरच्या माध्यमातून जितेंद्र आव्हाड यांनी संताप व्यक्त केला आहे.
ब.मो.पुरंदरेंना पडमविभूषण हा शिवप्रेमींच्या भळभळून वाहणाऱ्या जखमेवर मीठ चोळण्याचा धंदा …शिव विचारांनी महाराष्ट्र पेटवणार …. pic.twitter.com/QbinKjENo8
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) January 26, 2019
ट्विटरवर त्यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे की, ‘शिवद्रोही ब.मो. पुरंदरेंना पद्मविभूषण जाहिर, छत्रपतींच्या इतिहासासाठी लाजिरवाणी गोष्ट, महाराजांची बदनामी करणाऱ्याला सरकार पोसतंय’. पुढच्या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं आहे की, महाराष्ट्र पेटवणार, परत एकदा, शिवसन्मान परिषदा घेणार. या ट्विटमध्ये त्यांनी श्रीमंत कोकाटे, ज्ञानेश महाराव, सुषमा परदेशी यांच्या नावे हॅशटॅग केला आहे.
महाराष्ट्र पेटवणार …..
परत एकदा ….
शिव सन्मान परिषदा घेणार
ब.मो.पुरंदरेंना सन्मानित करून शिवप्रेमींच्या जखमांना मीठ चोळले#श्रीमंतकोकाटे #ज्ञानेशमहाराव#सुषमापरदेशी #जयजिजाऊजयशिवराय— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) January 26, 2019
अशा दोन पोस्ट जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर पोस्ट केल्या आहेत. महाराष्ट्र भूषण पुरस्कार दरम्यानही जितेंद्र आव्हाड, संभाजी ब्रिगेड आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी पुरंदरेंना विरोध केला होता. पुन्हा एकदा राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनीही या पुरस्काराला विरोध केला आहे.
नेमकं प्रकरण काय?
बाबासाहेब पुरंदरे यांच्यावर आरोप आहेत की, त्यांनी शिवाजी महाराजांच्या चरित्रावर आणि जीवनावर वादग्रस्त लिखान केलं आहे. तसेच त्यांच्यावर हा पण आरोप आहे की, त्यांनी शिवाजींचे गुरु समजले जाणारे दादोजी कोंडदेव यांच्याबद्दल खोटी माहिती दिली आहे.
कोण आहेत बाबासाहेब पुरंदरे?
बाबासाहेब पुरंदरे यांचा जन्म 29 जुलै 1922 रोजी पुणे येथे झाला. 17 वर्षाचे असताना त्यांनी शिवाजी महारांजावर गोष्टी लिहिल्या. या गोष्टी ‘ठिणग्या’ नावाच्या पुस्तकाच्या रुपात सर्वांसमोर आल्या. यानंतर त्यांनी ‘छत्रपती शिवाजी महाराज’ आणि ‘नारायण राव पेशवा’ यांच्यावर ‘केसरी’ नावाचे पुस्तक लिहिले. यासोबतच पुरंदरेंनी लिहिलेले ‘जाणता राजा’ नाटकही महाराष्ट्रात खूप प्रसिद्ध झाले आहे. या नाटकाचे हिंदीतही अनुवाद करण्यात आले आहे.