नवी दिल्ली : भारतीय जनता पार्टीच्या अध्यक्षपदी भाजप नेते जे. पी. नड्डा यांची वर्णी लागली (J.P. Nadda New BJP President)आहे. पक्षाचे राष्ट्रीय निवडणूक अधिकारी राधामोहन सिंह यांनी जे. पी. नड्डा यांच्या नावाची घोषणा केली आहे. भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षासाठी सोमवारी (20 जानेवारी) दुपारी 12.30 पर्यंत अर्ज दाखल करण्याची वेळ होती. यावेळी जे. पी. नड्डा यांच्याशिवाय अन्य कोणत्याही नेत्याने अर्ज दाखल केला नाही. त्यामुळे जे. पी. नड्डा यांची बिनविरोध निवड करण्यात आली (J.P. Nadda New BJP President).
जे. पी. नड्डा हिमाचल प्रदेशातून राज्यसभा खासदार आहेत. भाजपचे 11 वे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून नड्डा यांची निवड करण्यात आली. त्यांचा कार्यकाळ पुढील तीन वर्षासाठी असणार आहे. सध्या दिल्लीत विधानसभा निवडणुकांची धामधूम सुरु आहे. त्यानंतर बिहार, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, तामिळनाडू यासह इतर मोठ्या राज्यात विधानसभा निवडणूक होणार आहेत. या निवडणुकांची मोठी जबाबदारी जे. पी. नड्डा यांच्यावर असणार आहे.
#WATCH Jagat Prakash Nadda takes over as National President of Bharatiya Janata Party (BJP) after being elected unopposed. pic.twitter.com/ZzADQd3WOX
— ANI (@ANI) January 20, 2020
जे. पी. नड्डा यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत चांगले संबंध आहेत. काही वर्षांपूर्वी मोदींनी हिमाचल प्रदेशाचे प्रदेशाध्यक्ष असताना नड्डा आणि मोदींचे चांगले संबंध बनले. त्यावेळी हे दोघेही दिल्लीतील अशोक रोडजवळील भाजप मुख्यालयातील आऊट हाऊसमध्ये एकत्र राहायचे. जे. पी. नड्डा यांनी मोदी सरकारच्या काळात आरोग्य मंत्रालयही सांभाळले आहे.
Jagat Prakash Nadda elected unopposed as the National President of Bharatiya Janata Party (BJP) pic.twitter.com/ek5PlEZ2sE
— ANI (@ANI) January 20, 2020
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा कार्यकाळ गेल्यावर्षी संपला होता. मात्र लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांचा कार्यकाळ वाढवण्यात आला. त्यानंतर लोकसभेतील यशानंतर अमित शाह यांना केंद्रीय गृहमंत्रिपदाची जबाबदारी देण्यात आली होती. यानंतर 17 जून रोजी भाजपच्या संसदीय बोर्डाने जगत प्रकाश नड्डा म्हणजेच जे. पी. नड्डा यांची भाजपचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून निवड केली (J.P. Nadda New BJP President) होती.
कोण आहेत जे.पी.नड्डा?