भोपाळ : लोकसभा निवडणुकीत सूपडासाफ झालेल्या काँग्रेसच्या अडचणी संपता संपेना झाल्या आहेत. महाराष्ट्रात काँग्रेसला भगदाड पडलं असताना, तिकडे मध्य प्रदेशातील काँग्रेसचा बडा चेहरा ज्योतिरादित्य शिंदे (Jyotiraditya scindia) नाराज आहेत. मध्य प्रदेशच्या अध्यक्षपदावरुन (PCC chief) नाराजीनाट्य सुरु आहे.
ज्योतिरादित्य शिंदे यांची मध्य प्रदेशच्या काँग्रेस अध्यक्षपदी नियुक्ती करण्यासाठी त्यांचे समर्थक आक्रमक झाले आहेत. मध्य प्रदेशातील दतिया जिल्ह्यातील काँग्रेस अध्यक्ष अशोक दांगी यांनी 500 कार्यकर्त्यांसह राजीनाम्याचा इशारा दिला. (Jyotiraditya scindia)
Congress leader Ashok Dangi from Datia, Madhya Pradesh has issued a press note saying, “if Jyotiraditya Scindia is kept away from state politics then he (Dangi) along with 500 people will resign from the party.” pic.twitter.com/n83LKXTmfm
— ANI (@ANI) August 30, 2019
या सर्व पार्श्वभूमीवर मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ (Madhya Pradesh Chief Minister Kamal Nath) यांनी दिल्लीत 10 जनपथवर जाऊन सोनिया गांधी यांची भेट घेतली.
कार्यकर्त्यांना त्यांची भूमिका मांडण्याचा अधिकार आहे. ज्योतिरादित्य शिंदे यांना अध्यक्ष करावं ही आमचीही भूमिका आहे. मी पक्षनेतृत्त्व सोनिया गांधी, राहुल गांधींनाही त्याबाबतची माहिती दिली, असं कमलनाथ म्हणाले. मी मुख्यमंत्री झालो तेव्हापासून नव्या अध्यक्षांची निवडणूक घेण्याची मागणी करत आहे, असंही कमलनाथ म्हणाले.
10 पेक्षा अधिक जण स्पर्धेत
दरम्यान, मध्य प्रदेश काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाच्या शर्यतीत दहापेक्षा जास्त जण आहेत. यामध्ये माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह, माजी केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे, अजय सिंह, मुकेश नायक, मीनाक्षी नटराजन यांचा समावेश आहे.
संबंधित बातम्या
काँग्रेसमधून आणखी एक आवाज, ज्योतिरादित्य शिंदेंकडूनही कलम 370 हटवण्याचं समर्थन