KDMC Election 2022 : फाटाफुटीचा फटका बसणार की पुन्हा विजय संपादन करणार शिवसेना? कल्याण डोंबिवली महापालिका प्रभाग 24चा हा लेखाजोखा!

| Updated on: Jul 30, 2022 | 7:30 AM

मागील वेळी या प्रभागात शिवसेनेच्या उमेदवाराने विजय संपादन केला होता. यावेळी शिवसेनेत झालेल्या बंडखोरीचा फटका बसतो, की पुन्हा शिवसेनाच बाजी मारते, हे पाहावे लागणार आहे.

KDMC Election 2022 : फाटाफुटीचा फटका बसणार की पुन्हा विजय संपादन करणार शिवसेना? कल्याण डोंबिवली महापालिका प्रभाग 24चा हा लेखाजोखा!
कल्याण डोंबिवली महानगरपालिका, वॉर्ड 24
Image Credit source: tv9
Follow us on

कल्याण डोंबिवली : शिवसेनेच्या (Shivsena) ताब्यात असलेली कल्याण डोंबिवली महानगरपालिका यावेळी कोणाकडे जाणार, हा प्रश्न सध्या राजकीय वर्तुळात चर्चिला जात आहे. कारण शिवसेनेला बंडखोरीचे ग्रहण लागले आहे. राज्यपातळीवर तर बंडखोरी होतच आहे मात्र त्याबरोबरच स्थानिक पातळीवरही त्याचे लोण पसरले आहे. त्यामुळे कल्याण डोंबिवली महापालिकेच्या या निवडणुकीत (KDMC Election 2022) चुरस निर्माण होणार आहे. प्रभाग क्रमांक 24मध्ये मागील वेळी शिवसेनेने बाजी मारली होती. महापालिकेत सध्या शिवसेनेची खरी टक्कर भाजपाला आहे. कारण भाजपा दुसऱ्या क्रमांकावरचा पक्ष होता. शिवसेनेच्या 52 जागांच्या खालोखाल भाजपाच्या (BJP) 42 जागा होत्या. यावेळी प्रभागरचना, आरक्षण आणि जागादेखील वाढल्या आहेत. केडीएमसीत आतापर्यंत 122 जागा होत्या. यावेळी 44 प्रभागांमध्ये जागा 122वरून 133वर गेल्या आहेत. 11 नवीन प्रभाग पाहायला मिळत आहेत. तीन सदस्यीय प्रभागरचना यावेळी असणार आहे.

प्रभागातील व्याप्ती कशी?

प्रभाग क्रमांक 24 आजदे-सागाव, डोंबिवली एमआयडीसीमध्ये आजदे गाव, सुदर्शननगर, पेंढारकर कॉलेज, एम्स हॉस्पिटल, आजदे पाडा, ओंकार इंटरनॅशनल स्कूल, साईबाबा मंदिर, एमआयडीसी ऑफिस, घरडा केमिकल लिमिटेड कंपनी, एमआयडीसी वसाहत, जिमखाना ग्राउंड, भारत नगर कॉलनी, गणेश विसर्जन तलाव, मिलाप नगर, मॉडेल कॉलेज असा महत्त्वाचा परिसर आहे.

लोकसंख्येचे गणित

प्रभाग क्रमांक 24मधील एकूण लोकसंख्या 35,853 इतकी आहे. यात अनुसूचित जातीची लोकसंख्या 2353 तर अनुसूचित जमातीची लोकसंख्या 477 इतकी आहे.

हे सुद्धा वाचा

कोण मारणार बाजी?

मागील वेळी या प्रभागात शिवसेनेच्या उमेदवाराने विजय संपादन केला होता. यावेळी शिवसेनेत झालेल्या बंडखोरीचा फटका बसतो, की पुन्हा शिवसेनाच बाजी मारते, हे पाहावे लागणार आहे.

विजयी उमेदवार (2015)

प्रभाग क्रमांक 24 मध्ये शिवसेना उमेदवार नीलिमा पाटील विजयी झाल्या होत्या.

प्रभाग 24 (A)

पक्षउमेदवारविजयी उमेदवार
शिवसेना
भाजपा
काँग्रेस
राष्ट्रवादी
मनसे
इतर

प्रभाग 24 (B)

पक्षउमेदवारविजयी उमेदवार
शिवसेना
भाजपा
काँग्रेस
राष्ट्रवादी
मनसे
इतर

प्रभाग 24 (C)

पक्षउमेदवारविजयी उमेदवार
शिवसेना
भाजपा
काँग्रेस
राष्ट्रवादी
मनसे
इतर

आरक्षण कसे?

यावेळी तीन सदस्यीय प्रभाग रचना असल्याने मागील वेळी असणारे आरक्षण बदलले आहे. त्यानुसार प्रभाग 24 अ हा सर्वसाधारण महिला उमेदवारासाठी, ब हादेखील सर्वसाधारण महिला उमेदवारासाठी राखीव असणार आहे. तर क हा अनारक्षित असणार आहे.