कल्याण : खासदार श्रीकांत शिंदे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हेलिकॉप्टर प्रवासावर भाष्य केलंय. हेलिकॉप्टरने मुख्यमंत्री गावी जातात. कारण त्याच्याकडे वेळ नाही. आज एक-एक क्षण त्यांच्यासाठी महत्वाचा आहे. आम्ही सर्वत्र फिरतो हे काही लोकांच्या डोळ्यांत खुपतं आहे, असं श्रीकांत शिंदे म्हणालेत. सरकारमध्ये मंत्री आमदार बाहेर जातात. तेव्हा शिंदेसाहेबांना माहिती नव्हतं हे सरकार बनेल. बाळासाहेबांचा स्वप्न ज्यांनी पूर्ण केलं. त्यामुळे भाजपसोबत आम्ही युती केली. त्याचा आम्हाला अभिमान आहे, असंही ते म्हणालेत. ते कल्याणमध्ये बोलत होते.
विरोधक या सरकारला शिव्याशाप देतात. मला वाटतं झोपेमध्ये पण एकमेकांना तेच बोलत असतील. माझ्यावरही आळ घेतला तेव्हा पण तोंडावर पडले आता ही तोंडावर पडले, असं म्हणत संजय राऊत यांच्यावर श्रीकांत शिंदे यांनी टीका केली आहे.
दोन वेळा मला आणि शिंदे साहेबांना दोन वेळा कोविड झाला.तरी आम्ही सर्व कामं केली आणि आपण आपली टिमकी वाजवतात. कोणी तरी बॅनर लावतात. आम्हाला निधी माध्यमातून खूप खोके देतात. आमच्याकडून कोण तुमच्याकडे आले का ?, असा सवाल श्रीकांत शिंदे यांनी ठाकरे गटाला सवाल केलाय.
मुंबईत रस्ते नाही मात्र हे जे जिथे जातात तिथे शिकून येतात आणि मुंबईत नाईट लाईफ पाहिजे बोलतात, असं म्हणत श्रीकांत शिंदे यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केलीय.
350 वर्ष छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकला यायला यांना वेळ नाही. दोन दिवसआधी युवराजांचा वाढदिवस झाला. मात्र तेव्हा ही यांना लोकांना भेटण्यासाठी यांना वेळ नाही म्हणून या गोष्टी घडल्या, असं म्हणत श्रीकांत शिंदे यांनी ठाकरे गटावर टीका केलीय.
खोके एवढे त्यांच्या डोक्यात घुसले आहेत. कार्यकर्ता खाली राबला आणि आपण ऑनलाइन मार्गदर्शन केला तरी तुम्ही टॉप 5 मध्ये आहात. शिंदे साहेबांने तुम्हाला जीव लावला. कुठली आपत्ती आली तर शिंदे साहेबांना सांगितलं जायचं. मग आता शिंदे आपल्याला खुपायला का लागले, असं श्रीकांत शिंदे म्हणालेत.
विरोधकांना दुसरं काही काम उरलेलं नाही. विरोधकांना एकच काम आहे, युतीत वितुष्ट कसं निर्माण होईल. यांच्यामध्ये लाव्यालावी कशा करायच्या हेत त्यांचं ध्येय आहे, असं श्रीकांत शिंदे म्हणालेत.