उत्तर प्रदेश : मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या (Raj Thackeray) अयोध्या दौऱ्याला (MNS Ayodhya Tour) एकीकडे भाजप खासदार बृजभूषण सिंह (Brijbhushan Singh) यांनी विरोध केलाय. उत्तर प्रदेशच्या जनतेची माफी मागा, या मागणीवर ते ठाम आहेत. तर आता दुसरीकडे राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला स्वाध्वी कांचनगिरी यांनी पाठिंबा दिलाय. सोबत त्यांनी बृजभूषण सिंह यांनी थेट आव्हानही दिलंय. मोदींना पत्र लिहून बृजभूषण सिंह यांना समजवा, अशी मागणी साध्वी कांचनगिरी यांनी केली आहे. तसंच राज ठाकरेंना अयोध्येत येण्यापासून कोण रोखतं ते मी बघतेच, असं म्हणत त्यांनी बृजभूषण सिंहांना चुचकारलंय. बुजभूषण सिंह यांच्यावर कांचनगिरी यांनी जोरदार निशाणा साधला. संतांचा सन्मान न करणारे, राष्ट्राचा काय सन्मान करणार? असा सवाल कांचनगिरी यांनी बृजभूषण सिंह यांनी उपस्थित केलाय. तर दुसरीकडे राज ठाकरे यांचं तोंडभरुन कौतुकही केलंय.
कांचनगिरी यांनी टीव्ही 9 मराठीचे प्रतिनिधी संदीप राजगोळकर यांच्या बातचीत करताना बृजभूषण सिंह यांच्यावर टीका केली. राज ठाकरेंची बाजू घेत साध्वी कांचनगिरी यांचा बृजभूषण सिंहावर पलटवार केलाय. त्यांनी म्हटलंय, की…
हे सुद्धा वाचाराज साहेबांचं सगळ्यात आधी मी अभिनंदन करते. त्यांच्यात बाळासाहेबांची छबी दिसते.. ते हिंदूंचा आवाज आहेत.. भोंगे उतरवण्याबाबत त्यांचं अभिनंदन..
बृजभूषण यांचे हात रक्ताने माखलेले आहेत, त्यांनी दुसऱ्याकडे बोट दाखवून नये..त्यांना संतांच्या रोषाचा सामना करावा लागेल..
मोदींना याबाबत पत्र लिहिलंय. त्यांना समजवा.. त्यांना संतांचा सामना करावा लागेल.. चमकण्यासाठी बृजभूषण काम करतायत.. बृजभूषण यांना रोखावंजर तुम्हाला जराजरी दया असती, तर तुम्ही फॅक्टरी लावली असती, लोकांना काम दिलं असतं… रोजगार दिला असता…
मी चॅलेंज करते.. राज येणारच.. मी बघतेच बृजभूषण किती विरोध करतात ते..यांची काय हिंमत आहे…मी यांना बघून घेईल.. मी एकटी यांना पुरून उरेन..जर तुम्ही एका संताचा सन्मान करु शकत नाही, तर राष्ट्राचा सन्मान तुम्ही काय करणार
राज ठाकरेंचा संताप्रती आदर आणि प्रेम दिसून येतो..माझ्याकडेही बृजभूषण यांच्याविरोधात अनेक पुरावे आहेत.. बघुया कुणात किती दम आहे..राज ठाकरेंना कोण रोखतं ते बघतेच मी…
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा 5 जून रोजी अयोध्या दौरा असणार आहे. या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर भाजप खासदार बृजभूषण सिंहांनी केलेल्या विरोधामुळे राजकीय वातावरण तापलंय. याआधी मनसे नेत्यांनीही बृजभूषण सिंहाना आव्हान दिलं होतं.
दरम्यान, यूपीतल्या लोकांनी माफी मागितल्या शिवाय राज ठाकरेंना अयोध्येत पाय ठेवू देणार आहे, असं आव्हान बृजभूषण सिंहांनी दिलं होतं. तर दुसरीकडे राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मनसे कार्यकर्ते कामाला लागल्याचंही दिसून येतंय. मनसेकडून राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याची जय्यत तयारी केली जातेय.