मुंबई : मुंबई आणि मुंबई पोलिसांबद्दल वक्तव्य केल्यानंतर अभिनेत्री कंगना रनौतविषयी सर्व स्तरातून संताप व्यक्त केला जात आहे. “मी 9 सप्टेंबरला मुंबईत येत आहे, कोणाच्या बापात हिंमत असेल तर थांबवा” अशा शब्दात कंगनाने ट्विटरवरुन चॅलेंज दिले आहे. कंगना इथे आली तर आमच्या रणरागिणी तिचे थोबाड फोडल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा शिवसेना नेते प्रताप सरनाईक यांनी दिला. (Kangana Ranaut decides to visit Mumbai Shivsena answers)
“बरेच जण मला मुंबईला परत न येण्याची धमकी देत आहेत, म्हणून मी आता येत्या आठवड्यात 9 सप्टेंबरला मुंबईला जाण्याचा निर्णय घेतला आहे. मी मुंबई विमानतळावर किती वाजता उतरणार याची वेळ लवकरच सांगेन. कोणाच्या बापात हिंमत असेल तर थांबवा” असा एल्गार कंगनाने केला.
I see many people are threatening me to not come back to Mumbai so I have now decided to travel to Mumbai this coming week on 9th September, I will post the time when I land at the Mumbai airport, kisi ke baap mein himmat hai toh rok le ? https://t.co/9706wS2qEd
— Kangana Ranaut (@KanganaTeam) September 4, 2020
भाजप नेते परवेश साहिब सिंह यांच्या ट्वीटला उत्तर देताना कंगनाने ही घोषणा केली. “कुणाच्या वडिलांची जहागीर आहे का मुंबई? महाराष्ट्रात काय होत आहे उद्धव ठाकरे?” असा प्रश्न त्यांनी विचारला होता.
किसी के पिता की जागीर है मुम्बई?
ये महाराष्ट्र में क्या हो रहा है @OfficeofUT? https://t.co/MApWS6h1Qk— Parvesh Sahib Singh (@p_sahibsingh) September 4, 2020
कंगना इथे आली तर आमच्या रणरागिणी तिचे थोबाड फोडल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा शिवसेना नेते प्रताप सरनाईक यांनी दिला.
कंगनाला खासदार @rautsanjay61 नी सौम्य शब्दांत समज दिली.ती इथे आली तर आमच्या रणरागिणी तिचे थोबाड फोडल्याशिवाय राहणार नाहीत. उद्योजक व सेलेब्रिटी घडवणाऱ्या मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी करणाऱ्या कंगनावर देशद्रोही म्हणून गुन्हा दाखल करण्याची मी गृहमंत्र्यांना मागणी करणार आहे.
— Pratap Sarnaik (@PratapSarnaik) September 4, 2020
गृहमंत्र्यांची प्रतिक्रिया
मुंबई पोलिसांची तुलना स्कॉटलंड पोलिसांसोबत केली जाते, पण काही जण मुंबई पोलिसांवर प्रश्न उपस्थित करत आहेत. त्यांना मुंबईत राहायचा हक्क नाही, अशी प्रतिक्रिया गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.
काय आहे प्रकरण ?
“शिवसेना नेते संजय राऊत यांनी मला उघड धमकी दिली आणि मुंबईत पुन्हा पाऊल ठेवू नकोस असा इशारा दिला. याआधी मुंबईच्या रस्त्यांवर ‘आझादी’च्या घोषणा देण्यात आल्या. आता उघडपणे धमक्या मिळत आहेत. मुंबई पाकव्याप्त काश्मीरप्रमाणे का वाटत आहे?” असा प्रश्न कंगनाने ट्विटरवरुन विचारला होता.
मुंबई पोलिसांशी हुज्जत
ट्विटरवर आपली बदनामी करणारे ट्वीट ‘लाईक’ करण्यावरुन कंगनाचे काही दिवसांपूर्वी मुंबई पोलिसांशी वाजले होते. “सुशांतच्या मारेकऱ्यांविरुद्ध लढा देणाऱ्या लोकांची निंदा करणारे ट्वीट लाईक केले जात आहेत. छेडछाड आणि दमदाटीचा निषेध करण्याऐवजी मुंबई पोलीस आयुक्त त्यांना प्रोत्साहन देत आहेत. लज्जास्पद!!” असे ट्वीट कंगनाने स्क्रीनशॉटसह केले होते. (Kangana Ranaut decides to visit Mumbai Shivsena answers)
“बॉलिवूड माफियांपेक्षा मला मुंबई पोलिसांची जास्त भीती वाटते. त्यामुळे हिमाचल सरकार किंवा थेट केंद्र सरकारनेच मला सुरक्षा द्यावी” असंही कंगना म्हणाली होती. आधी मुंबई पोलीस आणि नंतर मुंबईविषयी वक्तव्य केल्याने सर्वसामान्य नागरिकांनी कंगनाचा समाचार घेतला होताच. पण शिवसेना खासदार संजय राऊत, भाजप नेते निलेश राणे, राष्ट्रवादीचे मंत्री धनंजय मुंडे, काँग्रेस मंत्री नितीन राऊत अशी सर्वपक्षीय टीकाही तिच्यावर झाली.
संजय राऊत यांचा हल्लाबोल
“ही मुंबई 106 हुतात्मांनी मिळवली आहे. या मुंबईचं रक्षण आमच्या पोलिसांनी केलं आहे. 26/11 हल्ला मुंबई पोलिसांनी परतवला, कसाबला याच पोलिसांनी पकडलं, अशा या मुंबई पोलिसांबद्दल कुणीही ऐरे-गैरे काहीही बोलत असतील, तर त्यांच्यावर राज्य सरकारने कारवाई करावी” असे राऊत म्हणाले.
“मी पोकळ धमक्या देत नाही, मी शिवसैनिक आहे, अॅक्शनवाला माणूस, नौटंक्या करत नाही, या काही मेंटल केस मुंबईत वाढल्या आहेत, त्यांच्यावर आरोग्य खात्याने उपचार करावे आणि महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी कारवाई करावी” अशा शब्दात संजय राऊत यांनी कंगनावर हल्लाबोल केला.
“राम कदमांनी कंगना रनौतची तुलना झाशीच्या राणीशी करणं हा सर्वात मोठा अपमान आहे, झाशीची राणी ही महाराष्ट्राची वीरकन्या, महाराष्ट्राच्या अस्मितेवर गुळण्या टाकणाऱ्या कोणी स्वत:ला झाशीची राणी समजत असेल, आणि राजकीय पक्ष झाशीच्या राणीचा अपमान करणार असेल, तर राजकारण किती तळाला नेलंय हे स्पष्ट दिसतंय” असेही संजय राऊत म्हणाले.
संबंधित बातम्या :
फडणवीस हे कंगना आणि राम कदमांचे बोलवते धनी, कदमांची नार्को टेस्ट करा : सचिन सावंत
“उचलली जीभ…” मुंबईची PoK शी तुलना, कंगनाला रेणुका शहाणेंनी सुनावलं
“बाईसाहेब मुंबईत पर्यटनासाठी आला होता का?’ नितीन राऊतांचा कंगनाला सवाल
“मुंबईत परत पाऊल ठेवू नकोस” संजय राऊतांनी उघड धमकी दिल्याचा कंगनाचा गंभीर आरोप
आमच्या पोलिसांचा अपमान सहन करणार नाही, निलेश राणेंनी कंगनाला बजावले
(Kangana Ranaut decides to visit Mumbai Shivsena answers)