मुंबई: महाविकास आघाडी विरुद्ध अभिनेत्री कंगना रानौत असंच काहीसं चित्र गेल्या काही महिन्यात राज्यात पाहायला मिळत आहे. सुशांतसिंग राजपूत आत्महत्या प्रकरणानंतर कंगनाने राज्य सरकारवर गंभीर आरोप केले. त्यावरुन राज्य सरकारमधील अनेक मंत्री आणि नेत्यांकडून कंगनावर जोरदार टीका करण्यात आली. आता काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी कंगनाचा एक जुना व्हिडीओ ट्वीट करत, NCBकडे कारवाईची मागणी केली आहे. (Kangana’s old video tweet from Sachin Sawant, demand action)
“तुम्ही या व्हिडीओबद्दल कंगनाला कधी फोन करणार आहात? असं असूनही मोदी सरकारने तिला वाय दर्जाची सुरक्षा दिली आहे. कारण ती बॉलिवूडमधील ड्रग्ज रॅकेटसंबंधी माहिती देणार होती. मात्र, ती माहिती लपवत आहे आणि तो मोठा अपराध आहे,” असं ट्वीट करत सचिन सावंत यांनी कंगनावर कारवाईची मागणी केली आहे.
Dear NCB, She is bk!
When will you call @KanganaTeam for this video? Also Modi govt gave Y category security to her ( she is still enjoying at the cost of exchequer) as she wanted to give info abt drug racket in bollywood. She is still hiding info abt crime which is an offense pic.twitter.com/z5PWUWE8BA— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) December 30, 2020
अभिनेत्री कंगना रानौत हिने मंगळवारी सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलं. यावेळी कंगना हिरवी साडी, नाकात नथ आणि केसात माळलेला गजरा अशा पारंपारिक मराठमोळ्या वेषात आली होती. सिद्धिविनायकाचे दर्शन घेतल्यानंतर कंगना रानौतने मोठ्या उत्साहात हसतखेळत प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. मला मुंबईत राहण्यासाठी केवळ गणपती बाप्पाच्या परवानगीची गरज आहे. मी इतर कोणाकडेही परवानगी मागितली नाही, असे सांगत कंगनाने शिवसेनेला अप्रत्यक्ष टोला लगावला.
शिवसेनेला डिवचणाऱ्या अभिनेत्री कंगना रनौतला शिवसेना नेत्या उर्मिला मातोंडकर यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. बाईच्या डोक्यावर अपघात झाला की काय?, अशा शब्दात उर्मिला मातोंडकर यांनी कंगनाचं नाव न घेता टीका केली आहे. उर्मिला मातोंडकर यांनी ट्विट करून कंगनावर अप्रत्यक्ष हल्ला चढवला आहे. बाईंच्या डोक्यारवर अपघात झाला आहे का हो भाऊ?, असं ट्विट उर्मिला यांनी केलं आहे. तसेच माझ्या प्रिय मुंबईच्या पाठी उभं राहण्यासाठी हे ट्विट असल्याचे संकेतही त्यांनी दिले आहेत. उर्मिला यांनी या आधीही कंगनावर हल्लाबोल केला होता. त्यामुळे पुन्हा उर्मिला आणि कंगनामध्ये पुन्हा एकदा शाब्दिक धुरळा उडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
“for standing up for my beloved city Mumbai “ ???
बाईंच्या डोक्यावर अपघात झाला आहे का हो भाऊ…???— Urmila Matondkar (@UrmilaMatondkar) December 29, 2020
सिद्धिविनायकाच्या दर्शनानंतर कंगना रनौत म्हणाली जय महाराष्ट्र
Kangana’s old video tweet from Sachin Sawant, demand action