VIDEO | ठाकरेंविरोधात बोललात तर महागात पडेल, भाजप आमदार प्रशांत ठाकुरांसमोर शिवसैनिकांची घोषणाबाजी

| Updated on: Feb 18, 2022 | 3:30 PM

प्रशांत ठाकूर यांनी यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना म्हटले की, शिवसैनिकांना त्यांच्या पक्षाच्या घोषणा देण्याचं स्वातंत्र्य आहे, पण किरीटजींच्या विरोधात, भाजपच्या विरोधात तर घोषणा देत असतील तर पोलिसांनी त्यावर कारवाई केली पाहिजे, असे प्रशांत ठाकूर म्हणाले.

VIDEO | ठाकरेंविरोधात बोललात तर महागात पडेल, भाजप आमदार प्रशांत ठाकुरांसमोर शिवसैनिकांची घोषणाबाजी
भाजप आमदार प्रशांत ठाकूर यांनी नवी मुंबई विमानतळाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचं नाव देण्याला विरोध केला होता. त्यावेळचा हा फोटो आहे.
Follow us on

गिरीश गायकवाड, अलिबाग : भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somayya) आज अलिबागमधील कोर्लई गावात पोहोचले. यावेळी त्यांच्यासोबत भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने होते. मात्र कोर्लई (Alibagh Korlai) गावात शिवसैनिकही मोठ्या प्रमणात गोळा झाले होते. कोर्लई ग्रामपंचायतीसमोर दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते आमने सामने आले. किरीट सोमय्या यांच्यासोबत भाजप आमदार प्रशांत ठाकूर (Prashant Thakur) हेदेखील होते. सोमय्या आणि प्रशांत ठाकूर पंचायत समितीच्या कार्यालयात सरपंचांना भेटले. त्यानंतर प्रशांत ठाकूर बाहेर आले, तेव्हा शिवसैनिकांचा एक मोठा जमाव तिथे आला. यावेळी शिवसेने जिंदाबादच्या घोषणा सुरु झाल्या.

प्रशांत ठाकुरांसमोर शिवसैनिकांची दमबाजी

पंचायत समितीच्या कार्यालयातून बाहेर आलेल्या भाजप आमदार प्रशांत ठाकुर यांच्यासमोर शिवसैनिकांनी घोषणाबाजी आणि दमबाजीही करायला सुरुवात केली. ठाकरे कुटुंबियांविरोधात एक शब्दही बोललात तर महागात पडेल, असा दम काही शिवसैनिकांनी भरला. आमच्या नेत्याबद्दल वेडं-वाकडं बोललात तर आम्ही गप्प बसणार नाहीत..19 बंगले कुठे आहेत ते तुम्ही दाखवा.. असा दम शिवसैनिकांनी भरला.

प्रशांत ठाकूर यांची काय प्रतिक्रिया

यावेळी प्रशांत ठाकूर यांनी यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना म्हटले की, शिवसैनिकांना त्यांच्या पक्षाच्या घोषणा देण्याचं स्वातंत्र्य आहे, पण किरीटजींच्या विरोधात, भाजपच्या विरोधात तर घोषणा देत असतील तर पोलिसांनी त्यावर कारवाई केली पाहिजे, असे प्रशांत ठाकूर म्हणाले.

पंचायत समिती कार्यालयात काय घडलं?

भाजप नेते किरीट सोमय्या पंचायत समितीच्या कार्यालयात गेले, त्यानंतर अवघ्या पाचच मिनिटात ते कार्यालयाबाहेर आले. सोमय्यांनी सरपंच प्रशांत मिसाळ यांना नमस्कार केला. खुर्चीत बसले. तेवढ्यात प्रशांत ठाकूर यांनी खिशातून एक पत्र काढलं आणि ते मिसाळ यांना दिलं. त्यानंतर ते कार्यालयाबाहेर आले. सोमय्यांनी कार्यालयात आल्यानंतर आमच्याशी एका शब्दानेही चर्चा केली नाही, अशी प्रतिक्रिया सरपंच मिसाळ यांनी दिली आहे. सोमय्या पंचायत समितीच्या कार्यालयाबाहेर येताच शिवसैनिकांनी पुन्हा एकदा घोषणाबाजी केली. पुन्हा शिवसैनिकांनी सोमय्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र सोमय्या तत्काळ गाडीत बसले आणि रेवदंडा पोलीस ठाण्याच्या दिशेने निघाले. सोमय्या निघून जाताच त्या जागेवर दूध आणि गोमूत्र शिंपडण्यात आलं. हे शुद्धीकरण केल्याचं शिवसैनिकांनी सांगितलं.

इतर बातम्या-

Bachchan Pandey : अक्षय कुमारचा बच्चन पांडेचा ट्रेलर रिलीज, चार तासात तीन मिलियन पार

Eknath Khadse यांना धक्का , Jalgaonमधील बोदवड नगरपंचायत शिवसेनेच्या ताब्यात