Karnataka bypoll results Live : कर्नाटकातील 15 पैकी 12 जागी भाजपचा विजय

| Updated on: Dec 09, 2019 | 2:55 PM

कर्नाटक विधानभेच्या 15 जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत (Karnataka bypoll results) भाजपने दमदार विजय मिळवला.

Karnataka bypoll results Live : कर्नाटकातील 15 पैकी 12 जागी भाजपचा विजय
Follow us on

बंगळुरु : कर्नाटक विधानभेच्या 15 जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत (Karnataka bypoll results) भाजपने दमदार विजय मिळवला. मुख्यमंत्री येडियुरप्पांच्या नेतृत्त्वात भाजपने 15 पैकी 12 जागा जिंकत कर्नाटक, (Karnataka bypoll results) भाजप सरकारला स्थिरता मिळवून दिली. दोन जागा काँग्रेस तर एक जागी अपक्षाने विजय निश्चित केला. अद्याप सर्व जागांचा अंतिम निकाल हाती आला नसला, तरी आघाडीवरील उमेदवारांचं मताधिक्य पाहता त्यांचा विजय निश्चित मानला जात आहे. भाजपला या 15 जागांपैकी 6 जागांवर विजय अनिवार्य होता, अन्यथा कर्नाटकातील सरकार अल्पमतात आलं असतं. मात्र तब्बल 12 जागा जिंकून भाजपने दबदबा निर्माण केला.

कर्नाटक विधानसभेच्या या 15 जागांसाठी गुरुवारी 5 डिसेंबरला मतदान पार पडलं. 15 जागांसाठी 165 जण आपले नशीब आजमावत होते. महत्त्वाचं म्हणजे या 15 पैकी 6 मतदारसंघात भाजपला विजय मिळवणे गरजेचे होते. तसे न झाल्यास कर्नाटकातील येडीयुरप्पांच्या नेतृत्त्वातील भाजप सरकार कोसळू शकत होतं. इथे पुन्हा काँग्रेस आणि जेडीएस सत्ता स्थापनेचा दावा करु शकले असते.

गोकाक, अथणी, कागवाड, शिवाजीनगर, यशवंतपूर, महालक्ष्मी लेआउट ,के .आर. पूरम, होसकोटे, चिक्कबळळापूर, विजयनगर, हिरेकेरुर, राणीबेन्नूर, हुनसूर,  यल्लापूर या मतदारसंघात पोटनिवडणूक झाली. यापैकी होसकोटे, हुनसूर आणि शिवाजीनगर मतदारसंघ वगळता सर्व जागा भाजपने जिंकल्या.

कर्नाटकातील पक्षीय बलाबल

224 जागांच्या कर्नाटक विधानसभेत 223 जागांपैकी 15 जागांवर पोटनिवडणूक झाली. भाजपकडे आधी 105 जागा होत्या, त्यामध्ये या 12 जागांची भर पडल्याने, त्यांचं संख्याबळ आता 117 वर पोहोचलं आहे.  काँग्रेस 66 वरुन 68 वर पोहोचलं आहे. तर  जेडीएस 34 (3 बंडखोर), केपीजेपी 1, बसपा 1 आणि 2 अपक्ष आमदार आहेत.

….म्हणून 17 पैकी 15 जागांवर पोटनिवडणूक

काँग्रेस आणि जेडीएसच्या 17 आमदारांनी बंडखोरी करत भाजपला पाठिंबा दिल्यानंतर विधानसभा अध्यक्षांनी पक्षांतर बंदी कायद्यानुसार बंडखोर आमदारांचं सदस्यत्व रद्द केलं होतं. सुप्रीम कोर्टानंही सदस्यत्व रद्दचा निर्णय कायम ठेवला. मात्र, पुन्हा निवडणूक लढण्याची मुभा दिली.  त्यानंतर 15 जागांसाठी आज निकाल येत आहे . 17 पैकी 2 जागांवरील (राजेश्वरीनगर आणि मस्की) मागील निर्णयालाच न्यायालयात आव्हान देण्यात आलं आहे. त्यामुळे या ठिकाणी पोटनिवडणूक झालेली नाही. न्यायालयाच्या निकालानंतरच येथील पोटनिवडणुका घेण्यात येतील.

एक नामांकित सदस्य वगळता कर्नाटक विधानसभेची सदस्य संख्या 224 आहे. भाजपकडे सध्या 105 आमदारांचं बळ आहे. एका अपक्ष आमदाराचाही भाजपला पाठिंबा आहे. तर विरोधातील काँग्रेसकडे 66 आणि जेडीएसकडे 34 आमदार आहेत.  दोन जागा कोर्टाच्या निर्णयाअभावी रिक्त आहेत. त्यामुळं सभागृहाची सदस्यसंख्या 222 असेल. त्यामुळं बहुमतासाठी 112 आमदारांची गरज होती. येडियुरप्प यांना आपलं सरकार राखण्यासाठी आणखी 6 आमदारांची गरज होती.

Karnataka bypoll results

  • भाजप 6 जागांवर विजयी तर 6 जागांवर आघाडीवर
  • कर्नाटकातील 15 पैकी 12 जागी भाजपचा विजय जवळपास निश्चित
  • भाजपचा तीन जागांवर विजय, तर 9 जागी आघाडीवर
  • भाजप 15 पैकी 12 जागांवर आघाडीवर
  • 15 पैकी 11 जागांवर भाजपला आघाडी, तर दोन जागी काँग्रेस उमेदवार पुढे, जेडीएस आणि अपक्ष 1-1 जागी आघाडीवर
  • पहिल्या फेरीत 15 पैकी 10 जागांवर भाजपला आघाडी

विधानसभेचे सभापती रमेश कुमार यांनी जुलै 2019 मध्ये मोठा निर्णय घेत काँग्रेस- जेडीएसच्या 14 बंडखोर आमदारांचे सदस्यत्व रद्द केले. त्याआधी तिघांना निलंबित करण्यात आलं होतं. महत्त्वाचं म्हणजे विधानसभा अध्यक्षांनी 17 जणांना अपात्र ठरवत निवडणूक लढण्यास मज्जाव केला होता. मात्र सर्वोच्च न्यायालयाने गेल्या महिन्यात निकाल देताना या 17 आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय कायम ठेवताना त्यांना दिलासा दिला होता. हे आमदार पुन्हा निवडणूक लढवू शकतील असं नमूद केलं होतं.

ज्या 15 जागांसाठी पोटनिवडणूक होत आहे, त्या जागांवर भाजपने जे काँग्रेस-जेडीएसचे आमदार अपात्र ठरले होते, त्यांना आपल्याकडे खेचून उमेदवारी दिली. मात्र काँग्रेस-जेडीएसची  युती तुटल्याने 15 फुटीर आमदारांना पराभूत करण्याचा चंग दोन्ही पक्षांनी बांधला.

दुसरीकडे या आमदारांना निवडून आणण्यासाठी भाजपने पूर्ण ताकद लावली होती. मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांनी अपात्र आमदारांच्या विजयासाठी सर्व मतदारसंघात प्रचारसभा आणि रोड शो करून मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला. येडीयुरप्पा यांनी गेल्या दोन आठवड्यात 15 मतदारसंघात प्रचार केला असून, पाच हजार किलोमीटरचा प्रवास केला.

या मतदारसंघात पोटनिवडणूक

गोकाक, अथणी, कागवाड, शिवाजीनगर, यशवंतपूर, महालक्ष्मी लेआउट ,के .आर. पूरम, होसकोटे, चिक्कबळळापूर, विजयनगर, हिरेकेरुर, राणीबेन्नूर, हुनसूर,  यल्लापूर या मतदारसंघात पोटनिवडणूक झाली.

कर्नाटक विधानसभा निवडणूक

कर्नाटक विधानसभेच्या 224 जागांसाठी गेल्या वर्षी निवडणुका झाल्या. या निवडणुकीत  भाजप 104, काँग्रेस 80 आणि जेडीएसला 37 जागा मिळाल्या होत्या. त्यात भाजप पहिल्या क्रमांचा पक्ष ठरला होता, मात्र काँग्रेस आणि जेडीएस एकत्र येऊन त्यांनी सत्ता स्थापन केली. तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या जेडीएसचे कुमारस्वामी मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले.  इथे सत्ता स्थापनेसाठी 113 जागांची गरज आहे.

कर्नाटकातील पक्षीय बलाबल

कर्नाटक विधानसभेत एकूण 225 जागा आहेत, एक नामांकित सदस्य आहे. बहुमतासाठी 113 जागांची आवश्यकता आहे. काँग्रेस 80 जेडीएस 37, केपीजेपी 1, बसपा 1 आणि 1 अपक्ष अशा 120 आमदारांसह काँग्रेस-जेडीएसची सत्ता होती. भाजपचे 104 आमदार निवडून आले होते. त्यामुळे भाजपला आणखी किमान दहा आमदारांची आवश्यकता होती. आपल्याला 120 आमदारांचा पाठिंबा असल्यामुळे सरकारला कोणताही धोका नसल्याचं कुमारस्वामींनी यापूर्वी म्हटलं होतं.

 

संबंधित बातम्या

Karnataka bypolls : कर्नाटकात 15 जागांसाठी पोटनिवडणूक, भाजपला 8 जागी विजय आवश्यक!   

कर्नाटकातील काँग्रेस-जेडीएसचे 17 आमदार अपात्रच, सुप्रीम कोर्टाचा निर्णय  

कर्नाटकात राजकीय भूकंप, उपमुख्यमंत्र्यांसह 32 मंत्र्यांचे राजीनामे