कर्नाटकात मुस्लीम उपमुख्यमंत्रीच हवा, पाहा कोणी केली ही मागणी

| Updated on: May 15, 2023 | 3:01 PM

कॉंग्रेसच्या विजयात आमचा मोठा हातभार आहे. कॉंग्रेस जवळ मुस्लीम समुदायातून एक आदर्श उपमुख्यमंत्री असायला हवा. ही त्यांची जबाबदारी असल्याचे या मुस्लीम नेत्याने म्हटले आहे.

कर्नाटकात मुस्लीम उपमुख्यमंत्रीच हवा, पाहा कोणी केली ही मागणी
dkshivkumar
Image Credit source: socialmedia
Follow us on

मुंबई : कर्नाटकात कधी नव्हे ते कॉंग्रेस मोठे बहुमत मिळाले असतानाही दोन दिवस होऊन मुख्यमंत्र्यांचे नावावर चर्चेचे गु-हाळ सुरूच आहे. मुख्यमंत्री पदासाठी ज्येष्ठ नेते सिद्धरमय्या आणि प्रदेशअध्यक्ष डी.के. शिवकुमार यांच्यात स्पर्धा सुरूच असताना आता एक नवीन मागणी पुढे आली आहे. यंदा कर्नाटक विजयात मु्स्लीम व्होट बॅंकेने मोठी साथ दिल्याने कॉंग्रेसने आता कर्नाटकात प्रथमच मुस्लीम उपमुख्यमंत्री द्यावा अशी मागणी पुढे आली आहे.

कर्नाटकात प्रचंड मोठे बहुमत मिळाल्याने कॉंग्रेसला एकीकडे उभारी मिळाली आहे. तर दुसरीकडे पक्षांतर्गत बंडाळी मोडून काढण्याचा प्रसंग येऊ शकतो याचीही धास्तीही कॉंग्रेसला लागली आहे. मुख्यमंत्री पदासाठी कोणाला पुढे आणावे या पेचात ‘हायकमांड’ असताना निवडून आलेल्या उमेदवारातून राज्याला प्रथमच मुस्लीम उपमुख्यमंत्री मिळावा अशी मागणी वक्फ बोर्डाचे चेअरमन शफी सादी यांनी केली आहे.

आम्हाला पंधरा जागा मिळाल्या आणि नऊ जागांवर मुस्लीम उमेदवार निवडूण आले आहेत. सुमारे 72 जागांवर कॉंग्रेस मुस्लीम मतदारांमुळे जिंकली आहे. एक समुदाय म्हणून कॉंग्रेसला आम्ही खूप काही दिले आहे. आता त्याची परतफेड करण्याची कॉंग्रेसची बारी आहे. आता ती वेळ आली आहे की आम्हाला आमचा वाटा मिळावा असेही शफी यांनी ‘आजतक’शी बोलाताना म्हटले आहे.

उपमुख्यमंत्री आणि पाच मंत्रीपदे

आम्हाला एक मुस्लीम उपमुख्यमंत्री आणि पाच मंत्रीपदे हवीत. ज्यांच्याकडे गृहमंत्रालय, आरोग्य, शिक्षण, वित्त मंत्रालयासारखी खाती असोत. कॉंग्रेसने आमचे आभार मानायला हवेत. आमच्यामुळे ते निवडून आले असून आमच्या लोकांना सत्तेत वाटा देण्यासाठीच सुन्नी उलेमा बोर्डाची ही आपत्कालीन बैठक बोलावली आहे.

विजयात आमचा मोठा हातभार

नऊ जणांमध्ये कोणाला ही पदे द्यायचे हे कॉंग्रेसने ठरवायचे आहे. कोणी चांगले काम केले आणि कोण चांगला उमेदवार आहे याचा निवाडा कॉंग्रेसने करायचा आहे. अनेक मुस्लीम उमेदवारांनी अन्य विधानसभा क्षेत्रात दौरा केला आणि तेथे प्रचार केला आहे. हिंदू आणि मुस्लीम एकतेसाठी काहीवेळा आम्ही आमच्या सीटला मागे ठेवले. त्यामुळे कॉंग्रेसच्या विजयात आमचा मोठा हातभार आहे. कॉंग्रेस जवळ मुस्लीम समुदायातून एक आदर्श उपमुख्यमंत्री असायला हवा. ही त्यांची जबाबदारी आहे.

आतापर्यंत मुस्लीम मुख्यमंत्री नाही…

अनुसूचित जातीनंतर आम्ही सर्वात मोठे अल्पसंख्यांक समुदाय आहोत. आम्हाला 30 हून अधिक जागा हव्या होत्या. त्या मिळाल्या नाहीत. आतापर्यंत कर्नाटकाला मुस्लीम नेतृत्व मिळाले नाही. परंतू  एसएम कृष्णा यांच्या वेळेप्रमाणे आम्हाला कमीत कमी पाच मंत्रीपदे हवीत आणि आता उपमुख्यमंत्री पदही हवे आहे, हीच आमची आग्रही मागणी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.