KDMC Election 2022 Ward 18 | मुंबई आणि आजुबाजूच्या परिसरात शिवसेना हा प्रबळ पक्ष होता. मुंबईनंतर ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली हा शिवसेनेचा (Shivsena) बालेकिल्ला होता. पण आता या बालेकिल्ल्याला मोठे भगदाड पडले आहे. सत्ताकेंद्रालाच मोठा हादरा बसल्याने कल्याण-डोंबिवली महापालिकेतील(Kalyan Dombivli MC) निवडणुकीत मोठे फेरबदल पहायला मिळतील. ठाणे परिसरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी पकड आहे. शिवाय या परिसरात शिवसेनेतून बाहेर पडलेली आणि दुखावलेले ही बरेच मोठे नेते आहेत. त्यांना यापूर्वी बळ मिळालेले नव्हते. पण आता त्यांना बळ मिळाले आहे. त्याचा परिणाम दिसून येईल. ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली या पालिकेत यापूर्वीच फाटाफुटीचे राजकारण पेटले आहे. मोठ्या प्रमाणात नगरसेवकांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केला आहे. या परिसरात मनसेची ही पकड आहे. तर राष्ट्रवादी ही मुसंडी मारण्याच्या तयारीत आहे. डोंबिवली तर भाजपची चांगली पकड आहे. त्यामुळे शिंदे गटाला हाताशी धरुन भाजप (BJP) सत्तेत वाटेकरी होण्यासाठी रान पेटवेल यात शंका नाही.
कल्याण-डोंबिवली महापालिकेत उत्तर भारतीयांच्या मतदानाचा टक्का ही मोठा आहे. त्यांचा ही मोठा प्रभाव मतदानावर होईल. मनसेला सोबत घेऊन भाजप आणि शिंदे गटाने युती केल्यास त्याचा राष्ट्रवादीला फायदा होऊ शकतो. तर भाजपला परंपरागत मराठी आणि उत्तर भारतीय मतदार मतदान करेल. परंतु, शिवसेनेचा मतदार संभ्रमात आहे. त्याच्यापुढे आता पर्याय आहेत. हिंदुत्वाच्या मुद्यावर तीन पर्याय समोर आल्याने या मतांचे विभाजन होईल. तर काँग्रेस, राष्ट्रवादी त्याचा फायदा घेऊ शकतात. मराठीच्या मुद्यावर मनसे यावेळी मत मागणार का हा प्रश्न आहेच. तर स्थानिक आघाडीलाही यामध्ये फायदा होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
2011 मधील जनगणनेनुसार, महापालिका हद्दीत एकूण 15 लाख 18 हजार 762 नगारीक राहतात. आता या लोकसंख्येत मोठा बदल झाला असून त्यात वाढ झाली आहे. प्रभाग 18 मध्ये एकूण 37,561 इतकी लोकसंख्या आहे. त्यापैकी 4,561 लोकसंख्या अनुसूचित जाती आणि 665 लोकसंख्या अनुसूचित जमातीची आहे.
यंदाची कल्याण-डोंबिवली महापालिकेची निवडणूक पॅनल पद्धतीने होत आहे. यामध्ये एकूण 44 प्रभाग असणार आहेत. त्यापैकी 43 प्रभाग त्रिसदस्यीय व एक प्रभाग चार सदस्यांचा असेल. त्यामुळे एकूण 133 सदस्यांच्या सभागृहात 67 जागा महिलांसाठी राखीव आहेत. तर एकूण सदस्य संख्येपैकी अनुसूचित जातींसाठी 13 जागा राखीव असून त्यापैकी अनुसूचित जातींच्या महिलासाठी 7 राखीव आहेत. तसेच अनुसूचित जमाती साठी 4 जागा असून त्यापैकी 2 जागा अनुसूचित जमातीच्या महिलांसाठी राखीव आहेत. सर्वसाधारण गटासाठी (खुल्या) जागा 116 असून त्यापैकी 58 जागा महिलांसाठी राखीव असतील.
18 अ सर्वसाधारण महिला
18 ब अनारक्षित
18 क अनारक्षित
अर्जुन भोईर (भाजप)
या प्रभात सध्या खडेगोळीवली-चिंचपाडा हा परिसर येतो. विठ्ठलवाडी रेल्वे स्टेशन, पुणे लिंक रोड, बंजारा, कॉलनी, चिंचपाडा काही भाग, कैलासपती बिल्डिंग, पेन्सील फॅक्टरी, गावदेवी रस्ता, चिंचपाडा ग्रामपंचायत, उल्हासनगर पेट्रोल पंप आदी परिसराचा यामध्ये समावेश आहे.
पक्ष | उमेदवार | विजयी/आघाडी |
---|---|---|
भारतीय जनता पार्टी | ||
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस | ||
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष | ||
महाराष्ट्र नवनिर्माण सेना | ||
अपक्ष |
पक्ष | उमेदवार | विजयी/आघाडी |
---|---|---|
भारतीय जनता पार्टी | ||
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस | ||
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष | ||
महाराष्ट्र नवनिर्माण सेना | ||
अपक्ष |
पक्ष | उमेदवार | विजयी/आघाडी |
---|---|---|
भारतीय जनता पार्टी | ||
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस | ||
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष | ||
महाराष्ट्र नवनिर्माण सेना | ||
अपक्ष |