ठाणे : अभिनेत्री केतकी चितळेची (Ketaki Chitale) जेलवारी ही बऱ्याच दिवसानंतर संपली आहे. कारण आता केतकी चितळेला अॅट्रोसिटी प्रकरणात (Atrocty) जामीन मंजूर झाला आहे. ठाणे कोर्टाने हा जामीन 25 हजार रुपये जात मुचलक्यावर मंजूर केला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून याच प्रकरणाने केतकी चितळेच्या अडचणीत मोठी वाढ केली होती. शरद पवारांबाबत (Sharad Pawar) आक्षेपार्ह पोस्ट केल्यानंतर काही दिवसातच केतकीचा याही प्रकरणात नवी मुंबई पोलिसांनी ताबा घेतला होता. त्यानंतर तिची जेलवारी ही वाढतच गेली होती. ठाणे कोर्टने अनेकदा केतकी चिळेला कोठडी सुनावली होती. केतकीकडून अनेक दिवासांपासून जामीनासाठी प्रयत्न सुरू होते. मात्र आज अखेर तिला जामीन मिळवण्यात यश आलं आहे. त्यामुळे आता एका तरी प्रकरणात तिला मोठा दिलासा मिळाला आहे. तर दुसरीकडे महिला आयोगाने केतकीच्या प्रकरणाची दखल घेतली आहे.
केतकीने 1 मार्च 2020 मध्ये एक पोस्ट व्हायरल केली होती. त्याच प्रकरणात रबाळे पोलिसांनी केतकीविरोधात ही कारवाई केली होती. या वादग्रस्त पोस्टमध्ये तिने धर्माचा उल्लेख केल्याने ती पोस्ट अधिक व्हायरल झाली होती. नवबौध्द लोक 6 डिसेंबरला मुंबई दर्शनास येतात. अशा पध्दतीची पोस्ट तिने सोशल मीडियावरती शेअर केली होती आणि नवबौध्द या वाक्याचा संदर्भ देत स्वप्निल गोविंद जगताप यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीवरूनच आता केतकीला ताब्यात घेण्यात आलं होतं. त्यानंतर कोर्टानं तिला कोठडी मुक्कामी धाडलं होतं. तसेच एका समाजाची लोक मोफत आणि मुंबई पाहायला मिळते म्हणून येतात अशी पोस्ट केतकीने केली होती आणि तिच्या याच पोस्टवर सडकडून टीका झाली होती. यानंतर केतकीविरोधात आक्रमक वातावरण तयार झालं होतं.
अभिनेत्री केतकी चितळे आणि वाद हे समीकरण जणू नेहमीचं आहे. केतची चितळे ही तिच्या अनेक पोस्टमुळे याआधीही वादात सापडली आहे. तिच्यावर अनेकदा टीका झाली आहे. मात्र केतकीवर एकाचवेळी एवढ्या प्रकरणात गुन्हे दाखल होण्याची ही कदाचित पहिलीच वेळ असेल. त्यामुळे तिला अनेक दिवस हे या जेलमधून त्या जेलमध्ये आणि त्या जेलमधून या जेलमध्ये असेही काढवे लागवे आहेत. मात्र आता किमान एका तरी प्रकरणात दिलासा मिळाल्याने अॅट्रोसिटी प्रकरणात तरी तिचा जेल मुक्काम संपला आहे.