मुंबई : सोमवारी विधानपरिषद निवडणुकीचा निकाल हाती आले. हे निकाल महाविकास आघाडीसाठी धक्कादायक असे आहेत. महाविकास आघाडीकडील आमदारांचे संख्याबळ पहाता दहा जांगापैकी शिवसेनेचे (Shiv Sena) दोन उमेदवार, राष्ट्रवादीचे (NCP) दोन उमेदवार तर काँग्रेसचे दोन आणि भाजपाचे (BJP) चार उमेदवार विजयी होणे अपेक्षित होते. मात्र भाजपाकडे पुरेसे संख्याबळ नसताना देखील भाजपाचा पाचवा उमेदवार विजयी झाला. भाजपाचे प्रसाद लाड हे विजयी झाले. तर काँग्रेसचे उमेदवार चंद्रकांत हंडोरे यांचा पराभव झाला आहे. या पराभवामुळे महाविकास आघाडीमधील मतभेद टोकाला पोहोचले असल्याची माहिती समोर येत आहे. यावरून आता भाजप नेते किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे. शिवसेना ( माफिया सेनेला) 52 मतं मिळाली, त्यांची 12 मतं फुटली. आता लवकरच ठाकरे सरकारचे बारा वाजणार असं ट्विट सोमय्या यांनी केले आहे.
विधानपरिषद निवडणुकीमध्ये भाजपाने महाविकास आघाडीला मोठा धक्का दिला आहे. भाजपाचे पाचवे उमेदवार प्रसाद लाड हे देखील विजयी झाले आहेत. यावरून भाजप नेते किरीट सोमय्या यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे. शिवसेनेला (माफिया सेनेला) 52 मतं मिळाली. त्यांची 12 मतं फुटली. शिवसेनेकडे त्यांचे 55 मते तर 9 समर्थक आमदारांची 9 मते असे एकूण 64 मते होती. मात्र प्रत्यक्षात शिवसेनेला 52 मतं मिळाली. त्यांची एकूण 12 मते फुटली. आता लवकरच ठाकरे सरकारचे बारा वाजणार असे ट्विट सोमय्या यांनी केले आहे.
शिवसेनेला ( माफिया सेनेला) 52 मत मिळाली.
१२ मत फुटली ( 55 शिवसेना + 9 समर्थक = 64)
उद्धव ठाकरे सरकारचे बारा वाजणार हे निश्चित @BJP4India @Dev_Fadnavis
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) June 21, 2022
दरम्यान दुसरीकडे विधानपरिषदेत काँग्रेसचा उमेदवार पराभूत झाल्यामुळे काँग्रेस नेते शिवसेना आणि राष्ट्रवादीवर नाराज असल्याचे पहायला मिळत आहेत. अजून काही ठरलं नाही, मात्र काँग्रेसने दिलेला पहिल्या पसंतीचा उमेदवार जर परभूत होत असेल तर वेगळा काहीतरी विचार करायची वेळ आली आहे, असा इशारा काँग्रेस नेते नसीम खान यांनी दिला आहे. त्यामुळे आता काँग्रेस महाविकास आघाडीमधून बाहेर पडणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. या सर्व गोंधळात उद्धव ठाकरे सरकार पुढील आव्हानात वाढ होण्याची शक्यता आहे.