मुंबई : किरीट सोमय्या (Kirit Somayya) आणि संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या आरोप-प्रत्यारोपाच्या मालिकेत संजय राऊत यांनी किरीट सोमय्यांवर आज पुन्हा एकदा कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप केला. पवईतील पेरुबाग (Peru Bag) येथील पुनर्वसनाच्या प्रकल्पात सुमारे 300 ते 400 कोटींचा घोटाळा केला आहे. त्याची ट्रकभरून कागदपत्र माझ्याकडे आहेत, असा दावा संजय राऊत यांनी केला. तसेच कालपासून किरीट सोमय्या यांच्याविरोधात लोकांनी माझ्याकडे एक एक प्रकरण आणायला सुरुवात केली. आज सोमय्याविरुद्ध माझ्याकडे 211 प्रकरणं जमा झाली आहेत. सोमय्यानं वसुली करून जवळपास साडे सात हजार कोटी रुपयांचा घोटाळा केला आहे, असा आरोप संजय राऊत यांनी केलाय. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांच्या नावाने ही वसुली केल्याचं संजय राऊत यांनी म्हटलंय.
किरीय सोमय्या यांनी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांच्या नावावर खोट्या स्वाक्षऱ्या करून कोट्यवधी रुपये लोकांकडून वसूल केल्याचा आरोप संजय राऊत यांनी केलाय. ते म्हणाले, एवढा मोठा घोटाळा आहे की आम्हालाही मोजायला अवघड जात आहे. किरीट सोमय्या आणि भाजपच्या लोकांनी दोन एजंट लावले. कुणाकडून 50 लाखही घेतले. कुठे गेले हे पैसे? तो पैसा गोळा करत होता. फडणवीसांना 50 कोटी देणार असं याने लोकांना सांगितलं. फडणवीसांच्या नावे ही वसुली केली. त्यावर मंत्र्यांच्या खोट्या स्वाक्षऱ्या केल्या. मी सांगते जवळपास 300 कोटी रुपयांची वसुली फडणवीसांच्या नावे केली आहे. या सगळ्या घोटाळ्याची कागदपत्र मी आजच इकोनॉमिक ऑफिसमध्ये देणार आहे. आजच मुख्यमंत्र्यांना भेटून हा सगळा गैरव्यवहार उघडा पाडणार आहे. लोकांची काय लूट सुरु आहे, ते दाखवेन.
संजय राऊत यांनी किरीट सोमय्या यांच्यावर निशाणा साधताना, त्यांनी आणि भाजपच्या काही लोकांनी अनेक मंत्र्यांच्या नावे वसुली केली असल्याचा आरोप केला. संजय राऊत म्हणाले, सोमय्याने देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांच्या नावाने वसुली केलीच. तसेच अनेक केंद्रीय मंत्र्यांच्या नावानेही वसुली केली आहे. अमित शहांच्या नावावरही सोमय्यानं पैसे गोळा केले. मी आता एक एक भ्रष्टाचाराची प्रकरणं बाहेर काढणार आहे, असा इशारा संजय राऊत यांनी दिला.
किरीट सोमय्या आणि भाजप यांच्यावरील आरोपांवर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली होती. यावर संजय राऊतांनी चंद्रकांत पाटलांनाही इशारा दिला आहे. सोमय्यांच्या प्रकरणात तुम्ही पडू नका, महाराष्ट्राचे लोक सोमय्यांची धिंड काढणार आहेत. तुम्हीही उघडे व्हाल, या प्रकरणात पडू नका, असा इशारा संजय राऊत यांनी दिला आहे.
इतर बातम्या-
बीड जिल्ह्यात मुलींचा जन्म नाकारला जातोय, कुणाचा वचक राहिला नाही, पंकजा मुंडे यांचा रोख कुणाकडे?