मुंबई : शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ (Anandrao Adsul) यांची ईडी चौकशी होण्याची शक्यता आहे. भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी शिवसेनेचा दिग्गज नेता ईडीच्या रडारवर असल्याचं सूतोवाच केलं होतं. त्यानंतर सोमय्यांनी पत्रकार परिषदेत अमरावतीचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांचे थेट नाव घेत आरोप केले. अडसूळांची तक्रार रिझर्व्ह बॅंकेकडे करणार असल्याचंही सोमय्यांनी सांगितलं. त्यामुळे मिसेस वर्षा संजय राऊत यांच्यानंतर आता अडसूळ अंमलबजावणी संचालनालयाच्या निशाण्यावर येण्याची चिन्हं आहेत. (Kirit Somaiya to complain about former Shivsena MP Anandrao Adsul ED)
सिटी को ऑपरेटिव्ह बँक घोटाळाप्रकरणी शिवसेना नेते आनंदराव अडसूळ यांची चौकशी होण्याची शक्यता आहे. “बॅंकिंग क्षेत्रात जे खूप मोठ्या बाता करतात, त्यांच्याकडे पीएमसी बँकेचे पैसे पोहोचले आहेत. काही महिन्यांपूर्वी सिटी बॅंकेचे गुंतवणूकदार आले होते, आनंदराव अडसूळ यांचा विषय पुढे लावून धरणार. पीएमसी बॅंक असो किंवा सिटी बॅंक, दोषींवर कारवाई होणार” असा इशारा सोमय्यांनी दिला. आनंदराव अडसूळांबद्दल आम्ही रिझर्व्ह बॅंकेला कळवणार आहोत, असंही सोमय्या यावेळी म्हणाले.
– आनंदराव अडसूळ हे अमरावती लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार
– 1996 पासून पाच वेळा खासदारकी
– शिवसेनेच्या दिग्गज नेत्यांमध्ये अडसूळांचा समावेश
– गेल्या वर्षी लोकसभा निवडणुकीत नवनीत राणांकडून पराभवाचा धक्का
(Kirit Somaiya to complain about former Shivsena MP Anandrao Adsul ED)
“घोटाळे त्यांनी केले आणि आरोप आमच्यावर करत आहेत. शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी 13 हजार खातेधारांचे पैसे ढापले. शिवसेना खासदार संजय राऊत यांचा घोटाळा किती कोटींचा आहे, हे लवकरच समजेल. संजय राऊतांचा चेहरा पाहिल्यानंतर आता बस्स करा असंच वाटलं. ठाकरे कुटुंबाला भीती वाटते, त्यामुळे सामनाची भाषा बदलली. आता कोरोनाची बात करत आहेत. शिवसेनेचे अवस्था दयनीय आहे” असा घणाघातही सोमय्यांनी केला.
याच प्रकरणात सोमवारी खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांची ईडीकडून चार तास चौकशी करण्यात आली. प्रवीण राऊत हे पंजाब-महाराष्ट्र सहकारी बँक (पीएमसी) घोटाळ्यातील आरोपी आहेत. प्रवीण राऊत यांच्याशी संजय व वर्षा राऊत यांचे आर्थिक संबंध असून, त्यांचाही या घोटाळ्यात सहभाग असल्याचा ईडीला संशय आहे.
संबंधित बातम्या :
संजय राऊतांनंतर शिवसेनेचा आणखी एक नेता ‘ईडी’च्या रडारवर
(Kirit Somaiya to complain about former Shivsena MP Anandrao Adsul ED)